AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

HSC SSC Exam : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावं, बोर्डाकडून काही गोष्टी करण्यात येणार : वर्षा गायकवाड

वर्षा गायकवाड यांनी दहावी बारावीच्या परीक्षा (HSC SSC Exam), केंद्रीय अर्थसंकल्पातील (Budget) शिक्षणाविषयीची तरतूद आणि पहिली दुसरीचा अभ्यासक्रम यावर भाष्य केलं.

HSC SSC Exam : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावं, बोर्डाकडून काही गोष्टी करण्यात येणार : वर्षा गायकवाड
वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री
| Edited By: | Updated on: Feb 04, 2022 | 12:35 PM
Share

मुंबई: राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दहावी बारावीच्या परीक्षा (HSC SSC Exam), केंद्रीय अर्थसंकल्पातील (Budget) शिक्षणाविषयीची तरतूद आणि पहिली दुसरीचा अभ्यासक्रम यावर भाष्य केलं. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना वर्षा गायकवाड यांनी अभ्यास करण्याचं आवाहन केलं. दहावी बारावीच्या परीक्षांसदर्भात आम्ही सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत आहोत. बोर्डाकडून काही गोष्टी करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना आवाहन आहे की आपण अभ्यासावर लक्ष केंद्रीत कराव, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पत्रकार परिषद घेणार आहे, त्यामध्ये अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. केंद्रीय अर्थसंकल्पात नवीन शिक्षण धोरणासाठी निधीची तरतूद करण्यात आली नसल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं.

विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावं

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी ऑनलाईन परीक्षांसाठी आंदोलन केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना वर्षा गायकवाड यांनी अभ्यास करण्याचं आवाहन केलं. दहावी बारावीच्या परीक्षांसदर्भात आम्ही सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत आहोत. बोर्डाकडून काही गोष्टी करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या दृष्टीनं काम करण्यात येत आहे. बोर्डाकडून अधिक माहिती मिळेल, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

राष्ट्रीय शिक्षण धोरणासाठी निधी नाही

शिक्षण आणि आरोग्य लोकांचे मुलभूत अधिकार आहेत. अभ्यासक्रम आणि सुविधा चांगल्या असतील तर देशाचा विकास होईल. केंद्रानं अर्थसंकल्पात अनेक गोष्टी आहेत, आदर्श शाळा अशा सारख्या गोष्टी आपण अगोदरचं केल्या आहेत. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणासंदर्भात निधीबाबत तरतूद अर्थसंकल्पात पाहायला मिळाली नाही, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

प्राथमिक शाळांचा दर्जा उंचावणार

वर्षा गायकवाड यांनी मुंबईत महापालिकेकडून काही ठिकाणी पब्लिक स्कुल, इंटरनॅशनल स्कुल आणि सीबीएसई शाळा सुरु करण्यात आल्याचं सांगितलं. त्याप्रमाणेच प्राथमिक शाळांचा दर्जा उंचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं. आम्ही सध्या पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदल आहोत. पहिलीचं पुस्तक हे दोन भाषांमध्ये असेल. आणि दुसरीचं पुस्तक हे आदर्श शाळांना देणार आहोत, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

इतर बातम्या:

TET Exam Result Update : टीईटीचा निकाल कधी लागणार? MSCE च्या अध्यक्षांकडून महत्त्वाची माहिती

Maharashtra Education Minister Varsha Gaikwad said students should focus on study of HSC SSC exam

पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.