Maharashtra Kesri : महाराष्ट्र केसरीच्या गदेचं पूजन; मोहोळ कुटुंबाकडून दरवर्षी दिली जाते मानाची गदा

| Updated on: Apr 05, 2022 | 3:31 PM

पुण्यातील (Pune) अशोक मोहोळ आणि संग्राम मोहोळ यांच्या घरी महाराष्ट्र केसरीच्या (Maharashtra Kesri) गदेचे (Gada) पूजन करण्यात आले आहे. दरवर्षी मोहोळ कुटुंबाकडून मानाची केसरीची गदा दिली जाते.

Maharashtra Kesri : महाराष्ट्र केसरीच्या गदेचं पूजन; मोहोळ कुटुंबाकडून दरवर्षी दिली जाते मानाची गदा
मोहोळ कुटुंबाकडून महाराष्ट्र केसरी गदेचं पूजन
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : पुण्यातील (Pune) अशोक मोहोळ आणि संग्राम मोहोळ यांच्या घरी महाराष्ट्र केसरीच्या (Maharashtra Kesri) गदेचे (Gada) पूजन करण्यात आले आहे. दरवर्षी मोहोळ कुटुंबाकडून मानाची केसरीची गदा दिली जाते. पूजन करून गदा ही सातारला पाठवली जाणार आहे. अशोक मोहोळ आणि संग्राम मोहोळ यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरीच्या गदेचे पूजन करण्यात आले. दरम्यान, साताऱ्यात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित आणि जिल्हा तालीम संघ सातारा यांच्या सहकार्याने 64वी वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2021-22 ही पार पडत आहे. सातारा शहरातील छत्रपती शाहू संकुल या ठिकाणी आजपासून या शुभारंभ होणार आहे. यासाठी 36 जिल्ह्यातून 45 संघ आले आहेत. यामध्ये 900 मल्ल असणार आहेत. आज चार वाजल्यापासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

साताऱ्यात दुसऱ्यांदा स्पर्धा

साताऱ्यात पहिल्यांदा 1963 साली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा साताऱ्यात होत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली नाही. कोरोना संसर्ग कमी झाल्याने ही कुस्ती स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेचे चांगले नियोजन केले आहे.

पोलीस बंदोबस्त

या स्पर्धेसाठी पोलीस बंदोबस्त पुरेसा ठेवण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रत्येकाची तपासणी करूनच स्पर्धा पाहण्यासाठी सोडण्यात येणार आहे. नागरिकांकडूनही सहकार्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

आणखी वाचा :

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या ‘हिंदुत्ववादी भोंग्या’ची पुण्यातल्या प्रमुख शिलेदारालाच धास्ती, वसंत मोरे राजकीय धक्क्यात

Bullock Cart Race VIDEO | वेगवान बैल जोडीसमोर मालक पडला, पायाखाली तुडवला जाणार तोच…

PMPML : तोट्यातले मार्ग करणार बंद; ST संपानंतर काही ग्रामीण भागांत सुरू केली होती सेवा