राज्याची चिंता वाढवणारी बातमी, पुण्यातील ‘या’ गावात डेल्टा प्लसचे 2 रुग्ण, आरोग्य यंत्रणा ॲलर्ट

| Updated on: Aug 02, 2021 | 10:58 PM

जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात बेलसर येथे झिका विषाणूचा रुग्ण आढळला होता. आता पुरंदर तालुक्यातील नीरा जवळच्या थोपटेवाडीत कोरोना डेल्टा प्लस विषाणूने दोन रुग्ण बाधित झाले असल्याचं समोर आलं आहे.

राज्याची चिंता वाढवणारी बातमी, पुण्यातील या गावात डेल्टा प्लसचे 2 रुग्ण, आरोग्य यंत्रणा ॲलर्ट
फोटो : पीटीआय, प्रातिनिधिक फोटो
Follow us on

पुणे: जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात बेलसर येथे झिका विषाणूचा रुग्ण आढळला होता. आता पुरंदर तालुक्यातील नीरा जवळच्या थोपटेवाडीत कोरोना डेल्टा प्लस विषाणूने दोन रुग्ण बाधित झाले असल्याचं समोर आलं आहे.14 वर्षीय मुलासह 48 वर्षीय महिलेला डेल्टा प्लस विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. पुरंदर तालुक्यातील नीरा येथे कोरोनाच्या डेल्टा प्लसच्या विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. दोन रुग्णांना या विषाणूची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. लोकांनी या बाबत घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस या प्रकारातील विषाणूची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला जाधव यांनी दिली आहे. यामध्ये नीरा नजिकच्या थोपटेवाडी येथील एका 14 वर्षाच्या मुलाला तर एका 48 वर्षीय व्यक्तीला या विषाणूची बाधा झाली आहे. 14 वर्षीय मुलगा गेली आठ दिवस कोरोना बाधित असून त्याच्या आई वडिलांना ही कोरोनाची बाधा झाली होती पण त्यांच्या डेल्टा प्लसचे कोणतेही विषाणू आढळून आले नाहीत.

48 वर्षीय महिला गेल्या 12 दिवसांपूर्वी कोरोना बाधित झाल्या होत्या. दोन्ही रुग्णांची तब्बेत चांगली असून लोकांनी घाबरून जाऊ नये,असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी उज्वला जाधव यांनी केले आहे.

25 जणांची चाचणी

या दोघांसह 25 व्यक्तींच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या त्यापैकी या दोघांचे डेल्टा प्लसचे अहवाल बाधित आले. हा विषाणू आढळल्या नंतर या रुग्णाच्या परिसरातील लोकांचे नमूने तपासणीसाठी पाठवले आहेत. थोपटेवाडी गावात सर्वेक्षण करण्यात येत आहे.

रविवारी सुमारे 100 लोकांचे सर्वेक्षण आरोग्य कर्मचाऱ्यांनी केल्याची माहिती नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. अक्षय चव्हाण यांनी सांगितले. लोकांनी प्रशासनाला सहकार्य करून आजारी रुग्णांची तपासणी करून घ्यावी असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी उज्वला जाधव यांनी केले आहे.

पुरंदरच्या बेलसरमध्ये झिकाचा रुग्ण

महाराष्ट्रात झिकाचा विषाणूचा पहिला रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळला आहे. पुरंदर तालूक्यातील बेलसर या ठिकाणी झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाची आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.

इतर बातम्या:

झिका विषाणूचा धोका वाढला, केरळात एका शहरात 14 रुग्ण, तामिळनाडू सरकार अलर्ट, सीमेवर बंदोबस्त वाढवला

कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका वाढला, पाहा लक्षणं कोणती आणि लागण कशी होते?

Maharashtra Pune district reported two patients of Delta Plus Variant at Thopatewadi  Nira village of Purandar