Pune : संभाजीराजे छत्रपतींना पक्षीय राजकारणात अडकवू नका, अन्यथा…; पुण्यात मराठा समन्वयकांनी राजकीय पक्षांना दिला इशारा

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेसाठी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावी, असे मराठा संघटनांचे मत आहे. संभाजीराजेंना कोणत्याही राजकीय बेडीत अडकवू नका. तसे केल्यास त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही राजकीय पक्षांना देण्यात आला आहे.

Pune : संभाजीराजे छत्रपतींना पक्षीय राजकारणात अडकवू नका, अन्यथा...; पुण्यात मराठा समन्वयकांनी राजकीय पक्षांना दिला इशारा
संभाजीराजे छत्रपतींच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून राजकीय पक्षांना इशारा देताना महेश डोंगरेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 12:33 PM

पुणे : अपक्ष उमेदवारीला विरोध करू नका आणि राजकीय बेडीत अडकवू नका. अन्यथा मराठा समाज तुम्हाला तुमची जागा दाखवणार, असा इशारा मराठा समन्वयक महेश डोंगरे (Mahesh Dongre) यांनी दिला आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या अपक्ष उमेवदवारीवरून सध्या राजकीय (Politics) वातावरण तापले आहे. त्यावर विविध पक्षांचे नेते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यात आता मराठा समाजातील विविध संघटनांनी आपले मत नोंदवले आहे. मराठा समन्वयकांचा सर्वच राजकीय पक्षांना थेट इशारा पाहायला मिळत आहे. अपक्ष आमदारांनी संभाजीराजेंना (Sambhajiraje Chhatrapati) पाठिंबा द्यावा. 200 मतदारसंघाचा आम्ही सर्व्हे केला आहे. कोणाचा कळस कसा फिरवायचा, हे आम्हाला माहिती आहे, असे मराठा समन्वयक महेश डोंगरे म्हणाले आहेत. संभाजीराजेंच्या अपक्ष लढण्याला मराठा समन्वयकांतर्फे पाठिंबा दर्शविण्यात आला आहे.

शिवसेनेकडून विनंती अमान्य

संभाजी छत्रपती यांनी राज्यसभेसाठी पाठिंबा मिळावा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना शिवसेनेत प्रवेश करण्याची अट घातली. मात्र, संभाजीराजेंनी शिवसेना प्रवेशाला नकार दिला. अपक्ष म्हणून पाठिंबा द्या किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून घोषित करा, अशी विनंती संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना केली होती. मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील असा मला विश्वास आहे, असेही संभाजीराजे यांनी म्हटले होते. मात्र, शिवसेनेकडूनही ही विनंती अमान्य करण्यात आली. संजय पवार यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे संभाजीराजे अपक्ष म्हणूनच लढणार, हे स्पष्ट झाले आहे.

हे सुद्धा वाचा

मराठा संघटना पाठीशी

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेसाठी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावी, असे मराठा संघटनांचे मत आहे. संभाजीराजेंना कोणत्याही राजकीय बेडीत अडकवू नका. तसे केल्यास त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही राजकीय पक्षांना देण्यात आला आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाज जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे वाढत्या सस्पेंसवरून मराठा समन्वयकांनी आता मौन सोडले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.