माझे पती नसताना हे लोक…; हगवणे कुटुंबीयांच्या थोरल्या सुनेचा खळबळजनक खुलासा

वैष्णवी हगवणे या प्रकरणात वेगवेगळी माहिती समोर येत आहे. आता हगवणे यांची मोठी सून मयूरी हगवणे कुटुंबाबाबत मोठे खुलासे केले आहेत.

माझे पती नसताना हे लोक...; हगवणे कुटुंबीयांच्या थोरल्या सुनेचा खळबळजनक खुलासा
Mayuri
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 22, 2025 | 3:58 PM

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे सध्या सर्वत्र खळबळ माजली आहे. या प्रकरणात वेगवेगळी माहिती समोर येताना दिसत आहे. वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार असणारे तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि पती सुशील हगवणे अजूनही फरार आहेत. आता हगवणे कुटुंबीयांची थोरली सून मयूरी यांनी हगवणे कुटुंबीयांबाबत मोठा खुलासा केला आहे. तिने हगवणे कुटुंबीय कशी वागणूक द्यायचे याबाबत खुलासा केला आहे.

हगवणेंची थोरली सून मयूरीचा लग्नाच्या दोन दिवस आधी अपघात झाला होता. त्याविषयी बोलताना ती म्हणाली, ‘हगवणे कुटुंबीय माझ्या मिस्टरांना मारहाण करायचे. बायकोचा बैल म्हणायचे. तू तिची बाजू घेतो. तिच्यात हुरळून गेलाय म्हणायचे. माझं लग्न जेव्हा होतं तेव्हा दोन दिवस आधी माझा अपघात झाला होता. मी लग्नात उभं राहू शकत नव्हते. डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं होतं. मी माहेरी आल्यावर मी ऑपरेशन केलं होतं. माहेरी न येता मी सासरी राहिले तेव्हा मी वॉकरवर चालायचे. माझ्या सासूने तेव्हा माझ्यासाठी खूप केलं. पण नणदेला त्रास व्हायचा. माझ्या रुममध्ये मला जेवण आणून दिलं जात असायचं. पण नणदेने भांडण केल्यानंतर मला माझ्या खोलीत जेवण देणं बंद केलं होतं. मला महिनाभर आराम करायला सांगितलं होतं डॉक्टरांनी.’
वाचा: वैष्णवीचं बाळ कुटुंबीयांकडे कसं पोहोचलं? काकांनी दिली मोठी माहिती

पुढे ती म्हणाली, ‘मला मारहाण झाल्यावर मी पोलिसात तक्रार केली होती आणि आई व भावाला कळवलं होतं. माझे मिस्टर नसताना हे लोक यायचे आणि मला मारहाण करायचे आणि घरात कोंडून ठेवायचे. त्यानंतर ते पोलीस ठाण्यात सर्वात आधी जायचे. आमच्याकडून गाड्या वगैरे आमच्या हक्काचं काढून घेतलं होतं. आम्ही रात्रीचा प्रवास करू शकत नव्हतो. पोलिसांनी फक्त एनसीच घेतली. पण तक्रार घेतली नाही. चेहऱ्यावरून रक्त येत असतानाही पोलीस माझी समजूत घालत असायचे. मिटून घ्या. घरातीलच गोष्ट आहे, असं पोलीस म्हणायचे.’

मयूरीची पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली नाही. त्यांनी केवळ एनसी नोंदवला. ‘एकदा ९ वाजता पोलिसांनी बसून ठेवलं ते दीड ते दोन वाजता माझी एनसी घेतली. पण एफआयआरवर त्यांनी कारवाई केली नाही. नंतर माझ्या आईवडिलांविरोधात क्रॉस कंपलेट केली होती. माझ्या आईने नणदेला मारहाण केल्याचा आरोप केला होता. चार दिवस गायब होते. नंतर परत आले. पैसे देऊन त्यांनी प्रकरण मिटवल्याचं आम्हाला समजलं. ही काय करेल. आमच्या मोठमोठ्या अधिकाऱ्यासोबत ओळखी आहेत, असं ते म्हणायचे’ असा खुलासा मयूरीने केला.