MHADA exam revised schedule| म्हाडा भरती परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी होणार परीक्षा

| Updated on: Jan 06, 2022 | 3:35 PM

म्हाडाने आपल्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. म्हाडाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. म्हाडाने प्रसिद्धीपत्रक काढत ही माहिती दिली आहे. प्रसिद्धी पत्रकात म्हाडाची कल्स्टर 6 मधील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, टंक लेखक या संवर्गाकरता परीक्षा आता 7 , 8 व 9 फेब्रुवारी 2022 रोजी ऑनलाइन पद्धतीनं होणार आहेत.

MHADA exam revised schedule| म्हाडा भरती परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी होणार परीक्षा
Mhada
Follow us on

पुणे – महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरणातील (म्हाडा) सरळ सेवा भरती 2021-22  परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले असून 7 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान म्हाडा भरतीची ऑनलाईन परीक्षा होणार आहे, यापूर्वी 29 आणि 30 जानेवारीला हे परीक्षा होणार होती. मात्र याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पीएसआयमुख्य परीक्षा होणार असल्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

म्हाडा वेळापत्रकात केला बदल

म्हाडा व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा एकाच दिवशी आल्याचे लक्षात येताच म्हाडाने आपल्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. म्हाडाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. म्हाडाने प्रसिद्धीपत्रक काढत ही माहिती दिली आहे. प्रसिद्धी पत्रकात म्हाडाची कल्स्टर 6 मधील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, टंक लेखक या संवर्गाकरता 29 व 30 जानेवारी 2022 रोजी होणारी ऑनलाईन परीक्षा आता 7 , 8 व 9 फेब्रुवारी 2022 रोजी ऑनलाइन पद्धतीनं होणार आहे. या तीन दिवसात सकाळी 9 ते 11 , 12:30  ते 2:30 व  4 ते 6 अश्या परीक्षांच्या वेळा असतील असे या प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आलं आहे.

565 जागांसाठी परीक्षा, तक्रारींमुळे परीक्षा रद्द
राज्यात 12 डिसेंबर रोजी म्हाडाच्या 565 जागांसाठी परीक्षा होणार होती. मात्र परीक्षेपूर्वीच पेपर फुटल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. तशी काही उदाहरणेदेखील समोर आली होती. त्यानंतर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली होती. याच वेळी परीक्षेची नवी तारीख जाहीर करु असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र आता एमपीएससी आणि म्हाडाचे पेपर एकाद दिवशी होणार असल्यामुळे मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

पिकअप गाडी तीव्र उतारावरुन मागे दरीत कोसळली, दोन चिमुरड्यांसह महिलेचा मृत्यू

मुंडेसाहेब, भुजबळसाहेब, पवारसाहेब होते म्हणून…; आव्हाडांनी मांडला ओबीसी आरक्षणाचा इतिहास?

Gosekhurd | गोसेखुर्दच्या बाधित गावांचे सॅटेलाईट सर्वेक्षण; बाधित गावांतील नागरिकांचे स्थलांतरण होणार?