Gosekhurd | गोसेखुर्दच्या बाधित गावांचे सॅटेलाईट सर्वेक्षण; बाधित गावांतील नागरिकांचे स्थलांतरण होणार?

Gosekhurd | गोसेखुर्दच्या बाधित गावांचे सॅटेलाईट सर्वेक्षण; बाधित गावांतील नागरिकांचे स्थलांतरण होणार?
बैठकीत मार्गदर्शन करताना विभागीय आयुक्त, बाजूला अधिकारी.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाच्या कामाचा आढावा विभागीय आयुक्त श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी घेतला. गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणीपातळीनुसार 245 मीटर 50 सें.मी.पर्यंत बाधित होणाऱ्या नागपूर, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातील गावासंदर्भात या बैठकीत पुनर्वसनाबाबत आढावा घेतला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 06, 2022 | 3:04 PM

नागपूर : गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणीपातळीनुसार ज्या गावांचे स्थलांतरण करणे आवश्यक आहे अशा गावांचे सॅटेलाईट सर्वेक्षण करण्यात येत आहे. जी गावे अंशत: अथवा पूर्ण बाधित होणार आहेत अशा गावांचा पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी येथे दिल्या.

874 कोटी 67 लाख रुपयांचे वितरण

गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा निर्माण व्हावा, यास शासनाने प्राधान्य दिले आहे. गोसेखुर्द प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी बाराशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले होते. त्यानुसार नागपूर व भंडारा जिल्ह्याला निधी वितरीत करण्यात आला आहे. विशेष पॅकेज अंतर्गत कामे योग्य पद्धतीने व्हावीत, यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना शासनाच्या निर्देशानुसार लाभ वाटप करण्यात आला आहे. न्यायालयीन कक्षेत येणाऱ्या प्रकरणांचाही जलदगतीने निपटारा करण्याबाबत यावेळी संबधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.

गोठा बांधकामासाठी एकूण 15.91 कोटी

विशेष आर्थिक पॅकेजच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पर्यायी शेतजमिनीऐवजी रोख स्वरुपात एकूण 405 कोटी 25 लाख रुपये, तसेच पुनर्वसन अनुदानापोटी 25 हजार 246 खातेदारांना 195 कोटी 35 लाख रुपये, तर गोठा बांधकामासाठी एकूण 15.91 कोटी रुपये एकमुस्त अशी 534.87 कोटी रुपये तसेच वाढीव कुटुंबासाठी घरबांधणी अनुदानापोटी 24.70 कोटी रुपयांचे यानुसार वाटप करण्यात येत आहे. पॅकेजच्या दुसऱ्या टप्प्यातील एकूण निधीपैकी नागपूर व भंडारा जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांना 892 कोटी 81 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी 874 कोटी 67 लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.

15 हजार 226 जणांना निधी वाटप

या पॅकेजमधील 18 जून 2013 रोजीच्या शासन निर्णयानुसार 1199.60 कोटी रुपयांचे वितरण करताना नागपूर जिल्ह्यातील 8 हजार 275 कुटुंबातील 11 हजार 163 खातेदार असे एकूण 19 हजार 438 खातेधारकांना वाटप करण्यात आले. तसेच भंडारा जिल्ह्यातील 6 हजार 636 कुटुंब आणि 8 हजार 590 शेती खातेधारकांना असे एकूण 15 हजार 226 जणांना निधी वाटप करण्यात आला आहे. 94.39 असे त्याची एकूण टक्केवारी आहे. वाढीव कुटुंबांना पॅकेजचा लाभ देण्यासाठी काही तांत्रिक अडचणी येत असल्याचे उपायुक्त आशा पठाण यांनी सांगितले. त्यामध्ये एका कुटुंबाच्या नावावर एकापेक्षा अधिक घरे, एकाच घरावर एकापेक्षा जास्त कुटुंबांची नावे नमूद असणे, रिक्त भूखंड किंवा मोकळे क्षेत्र आदी त्यामागची कारणे आहेत. नागपूर जिल्ह्यातील 6 हजार 464 अर्जांपैकी छाननी केल्यानंतर 2 हजार 862 पात्र वाढीव कुटुंबांना 82 कोटी 96 लाख रुपये निधी वितरीत करायचा आहे. त्यापैकी 82 कोटी 94 लाख रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले आहे. ही रक्कम 2 हजार 860 कुटुंबांना वितरित करण्यात आली आहे. तर भंडारा जिल्ह्यातील 1 हजार 984 अर्जांपैकी छाननीनंतर पात्र ठरले आहेत. 705 वाढीव कुटुंब पात्र ठरली आहेत. त्यांना 20 कोटी 44 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

 

पोलिसांची पगार खाती Axis Bank मध्ये वळवली, फडणवीस-SBI ला कोर्टाची नव्याने नोटीस

काँग्रेस आमदार आपल्याच मंत्र्यांवर नाराज, दिल्लीत हायकमांडची भेट घेणार?

Nagpur | हिंगण्यात लपंडाव खेळत होती मुलं; छतावरील विद्युत तारांनी केला दहावीतील विद्यार्थ्याचा घात!

 

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें