आमदार रवींद्र धंगेकर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामुळे पब आणि बारवर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी देखील आता यावरुन पोलिसांविरोधात आक्रमक भूमिका घेत संताप व्यक्त केला आहे.

आमदार रवींद्र धंगेकर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले
Follow us
| Updated on: May 27, 2024 | 10:55 PM

पुण्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर पुण्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. पुण्यातील बेकायदेशीर पब आणि बार विरोधात कारवाईची मागणी करत, धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी आधी आंदोलन केलं. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाईंचा फोटो असलेल्या एका खोक्यावर 50 खोके, असं लिहिण्यात आलं आणि हातात 500 रुपयांच्या बनावट नोटा घेवून घोषणा दिल्या. हाच पैशांचा खोका घेवून धंगेकर आणि अंधारे, पुण्याच्या उत्पादन शुल्क विभागात शिरले आणि उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त चरणसिंग राजपूत यांच्यावर भडकले.

धंगेकरांचा वसुलीचा आरोप

हफ्ते घेवून बेकायदेशीर बार आणि पब सुरु असल्याचा आरोप धंगेकरांनी केला. सुषमा अंधारेंनी तर कोणत्या बार आणि पब कडून किती पैसे घेतले जातात, त्याची यादीच वाचून दाखवली. तर चरणसिंग राजपूत यांनी वसुलीचे आरोप फेटाळले असून, अशी कुठं वसूली होत असेल तर चौकशी करणार असल्याचं म्हटलंय आहे.

धंगेकर आणि अंधारेंनी 48 तासांचा वेळ पुण्यातल्या उत्पादन शुल्क विभागाला दिलाय. 48 तासांत बेकायदेशीर पब आणि बारवर कारवाई न झाल्यास, बुल्डोझर चालवण्याचा इशारा अंधारेंनी दिला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाईंनी धंगेकरांचा स्टंट असून, माझ्या फोटोचा वापर करुन 50 खोके असं लिहून बदनामी केल्याचं म्हटलंय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे आमदार धंगेकरांविरोधात तक्रारीची तयारीही केली आहे.

पुण्यातल्या अपघातानंतर बेकायदेशीर बार पबकडे धंगेकर आणि अंधारेंनी मोर्चा वळवलाय. वसुलीची यादी आणि वसुलीचा रेटही त्यांनी समोर आणला आहे.

प्रशासनाकडून कारवाई

कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पब आणि बार मालकांचे धाबे दणालले आहे. या अपघात प्रकरणानंतरच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली होती. ज्यामध्ये धडक मोहिमेत शहरातील तसेच जिल्ह्यातील 49 पब आणि बार वर कारवाई करण्यात आली होती. तसेच संबंधितांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते.

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर बेकायदेशीर पब आणि बारचा मुद्दा चर्चेत आला आहे. पुण्यात काही दिवसांपासून प्रशासनाने पब आणि बारवर कारवाई सुरु केली आहे. पुण्यातील पब संस्कृती विरोधात मनसेने देखील आंदोलन केले होते. एक सही संतापाची अशी मोहिम मनसेने राबवली होती.

Non Stop LIVE Update
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....