राज ठाकरे यांनी बाह्या सरसावल्या, ‘राज’दूतच्या निर्णयानंतर आता पुढचा मोठा निर्णय, पुण्यात घडामोडींना वेग

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सध्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. विशेषत: पुण्यात मनसेच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे.

राज ठाकरे यांनी बाह्या सरसावल्या, 'राज'दूतच्या निर्णयानंतर आता पुढचा मोठा निर्णय, पुण्यात घडामोडींना वेग
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फाईल फोटोImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 4:59 PM

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सध्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे शहराकडे सर्वात जास्त लक्ष केंद्रीय केल्याचं सध्याचं चित्र आहे. त्यामुळे पुण्यात मनसेच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. मनसे पुण्यातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी संपूर्ण शहरात एकूण 3500 राजदूत नेमणार आहे. सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या मदतीसाठी पक्षाने राजदूतबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे शहरात राजदूत नेमणार असल्याची बातमी ताजी असतानाच आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

राज ठाकरे डिसेंबर महिन्यात पुणे शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे पुण्यात मनसेच्या गोटात प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत. शहरातील प्रत्येक वार्डात राजदुतांच्या नेमणुकीसाठी चाचपणी सुरु आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली जाणार आहे. कारण राजदुतांच्या नेमणुकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: या सर्व राजदुतांना मार्गदर्शन करणार आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे येत्या डिसेंबर महिन्यात पुणे शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते 10 डिसेंबरला कदाचित आपल्या सर्व राजदुतांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. ते या राजदुतांचा मेळावा घेणार आहेत.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेल्या काही दिवसांपासून संघटनात्मक पातळीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. राज ठाकरे यांनी नुकतीच मुंबईत पक्षाचे सचिव आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबतची सविस्तर माहिती समजू शकलेली नव्हती. पण राज्यातील आगामी महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीविषयी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती.

राज ठाकरे यांनी मुंबईत बैठक घेतल्यानंतर पुण्यात हालचालींना वेग आला. पुण्याचे शहाराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी शहरात 3500 राजदूत नेमण्याबाबत इतर पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यानंतर राजदूत नेमण्याच्या प्रक्रियेला जोमाने सुरुवात झालीय.

पुणे शहरासोबत राज ठाकरे यांचं वेगळं नातं आहे. कारण मनसे पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्याच प्रयत्नात पुणेकरांनी राज ठाकरे यांचे 29 नगरसेवक निवडून आणले होते. तसेच एक आमदारही निवडून दिला होता. त्यामुळे पुण्याकडे राज ठाकरेंची आशा आहे.

पुण्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुकीचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत मनसेला कितपत प्रतिसाद मिळतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. या निवडणुकीत मनसेला चांगला प्रतिसाद मिळाला तर त्यापुढच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मनसेला चांगला प्रतिसाद मिळू शकतो.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.