अमित ठाकरे यांच्याकडे मनसे नेत्यांची सर्वात मोठी मागणी; पुण्यातील राजकीय समीकरणे ऐंशी कोनात बदलणार?

| Updated on: Sep 13, 2023 | 11:44 AM

लोकसभा निवडणुका जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यावर भर दिला आहे. मतदारसंघनिहाय आढावा घेतला जात आहे. अनेक राजकीय पक्षांनी महत्त्वाच्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. मनसेनेही सध्या पुण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे.

अमित ठाकरे यांच्याकडे मनसे नेत्यांची सर्वात मोठी मागणी; पुण्यातील राजकीय समीकरणे ऐंशी कोनात बदलणार?
amit thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे | 13 सप्टेंबर 2023 : सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीची जय्यत तयाीर सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जोरबैठका सुरू आहेत. सभा, संमेलने सुरू आहेत. बैठका घेऊन स्टॅटेजी ठरवली जात आहेत. कार्यकर्त्यांना टार्गेटही दिला जात आहे. राष्ट्रीय पक्षांपासून ते प्रादेशिक पक्षांपर्यंत सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीची पडघम वाजत असतानाच मनसेनेही त्यात उडी घेतली आहे. मनसेनेही लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

मनसेचे नेते अमित ठाकरे काल पुण्यात होते. त्यांनी काल लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी मनसेचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांकडून अमित ठाकरे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती जाणून घेतली. काय केले पाहिजे, मतदारांपर्यंत कसे पोहोचता येईल, कोणते मुद्दे उपस्थित केले पाहिजे, पुण्यातील कोणत्या भागात मनसे मजबूत आहे आणि कोणत्या भागावर अधिक जोर देण्याची शक्यता आहे, यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी अमित ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या.

तर रणनीती आखता येईल

या बैठकीत मनसेचा पुणे लोकसभेचा चेहरा आधी जाहीर करा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी अमित ठाकरे यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे लोकसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी तुमच्याकडूनच नाव येऊ द्या, अशी मागणीही या पदाधिकाऱ्यांनी केली. जोपर्यंत उमेदवार ठरत नाही, तोपर्यंत पुढे जाणं शक्य होणार नाही. लोकांनाही आपला उमेदवार कळला की पक्षाचा निवडणूक अजेंडा त्यांच्यापर्यंत मांडणं सोपं जाईल. तसेच पक्षाचा उमेदवार कोण आहे हे सुद्धा आताच मतदारांपर्यंत पोहोचवता येईल, असं या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

अहवाल राज ठाकरेंकडे

दरम्यान, अमित ठाकरे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. आता हा अहवाल पक्षाध्यक्ष राज ठाकरेंना देण्यात येणार आहे. कालच्या विधानसभा आढावा बैठकीनंतर अहवाल तयार करण्यात आला. पुढच्या बैठकीत मनसेच्या उमेदवारांबाबत चर्चा होणार आहे. मात्र चेहरा जाहीर केला तर रणनीती आखता येईल पदाधिकाऱ्यांचं बैठकीत सांगणं आहे. याबाबत अमित ठाकरे राज ठाकरेंशी चर्चा करणार अस्लयाचं सांगितलं जात आहे.

राजकारण बदलणार

दरम्यान, मनसे पुण्यात कुणाला उभं करणार यावर बरीचशी गणितं अवलंबून आहेत. मनसे नेते वसंत मोरे हे पुण्यातून लढण्यास उत्सुक आहेत. पण त्यांना पक्ष उमेदवारी देणार की नाही याबाबत शंका आहे. मात्र, असं असलं तरी पुण्यातून मनसेने कुणालाही उमेदवारी दिली तरी पुण्यातील राजकीय समीकरणे ऐंशी कोनात बदलणार असल्याचं सांगितलं जात आहे.