Pune Power theft : रस्त्याची कामं करणारे ठेकेदारच करतायत वीजचोरी! महावितरणनं भोरमध्ये ठोठावला 20 हजारांचा दंड

| Updated on: May 30, 2022 | 9:44 AM

भोर तालुक्यातील नसरापूर-चेलाडी रस्त्याचे गेल्या काही दिवसापासून सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. रस्ता बनवविण्यासाठी ठेकेदाराकडून रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावरून आणि वीजवाहक तारावर आकडा टाकून गेल्या काही दिवसांपासून चोरून विजेचा वापर सुरू होता.

Pune Power theft : रस्त्याची कामं करणारे ठेकेदारच करतायत वीजचोरी! महावितरणनं भोरमध्ये ठोठावला 20 हजारांचा दंड
आकडा टाकून होत असलेली वीजेची चोरी
Image Credit source: tv9
Follow us on

भोर, पुणे : रस्त्याचे काम करणारे ठेकेदारच वीजचोरी (Power theft) करत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. भोर तालुक्यातल्या नसरापूर गावात रस्त्याची कामे सुरू आहेत. ही कामे घेतलेल्या ठेकेदारांकडूनच (Contractors) हा प्रकार होत आहे. रस्त्याच्या कामासाठीची मशीनरी चालवण्यासाठी रस्त्याकडेला असणाऱ्या विजेच्या खांबांवरून आकडा टाकून वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यावर कारवाई करत महावितरणने (MSEDCL) ठेकेदाराला जवळपास 20 हजारांचा दंड ठोठावला आहे. नियमानुसार हा दंड आकारण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. दंड न भरल्यास ठेकेदारावर रीतसर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यामुळे अनेक ठिकाणी विजेची चोरी होत असल्याचेही एकूणच समोर आले आहे. त्यामुळे अशा वीजचोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी सर्वसामान्य करीत आहेत.

सिमेंट काँक्रिटीकरणाचे सुरू आहे काम

भोर तालुक्यातील नसरापूर-चेलाडी रस्त्याचे गेल्या काही दिवसापासून सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. रस्ता बनवविण्यासाठी ठेकेदाराकडून रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावरून आणि वीजवाहक तारावर आकडा टाकून गेल्या काही दिवसांपासून चोरून विजेचा वापर सुरू होता. सिमेंट काँक्रिटीकरण लेव्हलिंगसाठी वापरण्यात येणारी मशीन आणि होल मारण्यासाठी ड्रील मशीनसाठी याचा वापर केला जात होता. यासाठी गेल्या काही दिवसांपासून राजरोजपणे वीजचोरी सुरू होती.

ठेकेदार आणि महावितरण कर्मचाऱ्यांचे साटेलोटे?

या प्रकाराबाबत नागरिकांनी महावितरणाकडे तक्रार केली. त्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना वीजचोरी होत असल्याचे दिसले. नंतर महावितरणने त्याठिकाणचा आकडा काढून वायर जप्त केल्या. संबंधित ठेकेदार आणि महावितरण कर्मचारी यांचे साटेलोटे असल्याची नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

नियमानुसार 20 हजारांचा दंड

संबंधित ठेकेदाराला विनापरवाना विजेचा वापर केल्याबाबत महावितरणच्या नियमानुसार जवळपास वीस हजारांचा दंड आकारला गेला आहे. तर दंडाची रक्कम न भरल्यास ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.