Pimpri – Chinchwad| पिंपरी चिंचवडमधील पाणी पुरवठ्याची समस्या दूर करण्यासाठी महापालिकेनं घेतला मोठा निर्णय

| Updated on: Mar 26, 2022 | 5:56 PM

शहरातील अनेक भागामधून पाण्याच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. अनेक ठिकाणी पाइपलाइन फुटणे, लिकेज असणे.   याबाबत प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासकांनी पालिकेचा कारभार हाती घेतल्यानंतर झालेल्या जनसंवाद सभांमध्ये देखील पाणी प्रश्‍नावर सर्वाधिक तक्रारी आल्या होत्या.

Pimpri - Chinchwad|  पिंपरी चिंचवडमधील पाणी पुरवठ्याची समस्या दूर करण्यासाठी महापालिकेनं घेतला मोठा निर्णय
पिंपरी चिंचवड महापालिका भवन
Image Credit source: Tv9
Follow us on

पिंपरी- शहारत मागील आठवड्यापासून  पाण्याच्या मोठी समस्या (Water Shortage)निर्मण झाली आहे. शहराच्या अनेक भागात पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. नागरिकांच्या समस्या लक्षात घेत महापालिकेने पाणी पुरवठा विभागावर सल्लागार (Consultant on water supply department)नेमण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण लडकत फेब्रुवारी महिन्यामध्ये सेवानिवृत्त झाले. त्यानंतर विभागाचा अतिरिक्त कारभार बीआरटीएस विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांच्याकडे दिला आहे. आता पुन्हा या विभागासाठीच लडकत यांनाच सल्लागार नेमण्याचा घाट महापालिका प्रशासनाने (Municipal administration) घातला आहे.

सल्लागारांची नियुक्ती

शहरातील अनेक भागामधून पाण्याच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. अनेक ठिकाणी पाइपलाइन फुटणे, लिकेज असणे.   याबाबत प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासकांनी पालिकेचा कारभार हाती घेतल्यानंतर झालेल्या जनसंवाद सभांमध्ये देखील पाणी प्रश्‍नावर सर्वाधिक तक्रारी आल्या होत्या. दरम्यान, शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी पवना बंद जलवाहिनी प्रकल्प, भामा-आसखेड पाणीपुरवठा योजना व आंद्रा धरणातून देखील पाणी घेऊन शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. मात्र हे प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हाती घेतलेल्या या प्रकल्पांना यापूर्वीच सल्लागारांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यावर महापालिकेचे करोडो रुपये खर्च होत आहेत. असे असतानाही आता पुन्हा विभागासाठीच निवृत अधिकारी सल्लागार म्हणून नेमण्याची नवीन प्रथा प्रशासन सुरू करत आहे.

कामे पूर्ण होण्यास होईल मदत

पाणीपुरवठा विभाग मोठा भाग आहे. त्याला चार सहशहर अभियंते दिले तरी कमी पडतील. माजी अधिकाऱ्याला सल्लागार म्हणून घेतल्यास प्रकल्पांची कामे मार्गी लागतील. तसेच नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देणे, प्रकल्पांवर देखरेख ठेवणे या कामांसाठी आपण सल्लागार नेमणार आहे. माजी अधिकारी असल्याने त्यांना मोठा अनुभव आहे. त्यांनी अनेक वर्ष पाणीपुरवठा विभागामध्ये काम केले आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याची कामे मार्गी लागतील असा दावा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी केला आहे.

Kirit Somaiya : अनिल परबांचं रिसॉर्ट तोडण्यासाठी किरीट सोमय्या दापोलीत! आता थेट उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज

MPSC Group C Admit Card: गट क वर्गासाठीचे परीक्षा प्रवेशपत्र जाहीर ; प्रवेशपत्र थेट ‘या’ लिंकवरुन करा डाऊनलोड

जानवी कपूरचा कातिलाना अंदाज!