Pune crime : उधारीचे पैसे मागितले म्हणून कुऱ्हाडीनं सपासप वार केले, हडपसरमध्ये सराईतास बेड्या

| Updated on: Apr 06, 2022 | 3:24 PM

उधारीच्या वादातून तरुणाचा कुऱ्हाडीचे वार (Attack) करून खून (Murder) करण्यात आला आहे. उधार दिलेले पैसे परत मागितल्याचा राग आल्याने कुऱ्हाडीचे वार करून ही निर्घृण हत्या करण्यात आली आहे. फुरसुंगीतील (Fursungi) पापडेवस्ती येथील धनराज डेअरी येथे हा प्रकार घडला.

Pune crime : उधारीचे पैसे मागितले म्हणून कुऱ्हाडीनं सपासप वार केले, हडपसरमध्ये सराईतास बेड्या
खून (प्रातिनिधिक छायाचित्र)
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : उधारीच्या वादातून तरुणाचा कुऱ्हाडीचे वार (Attack) करून खून (Murder) करण्यात आला आहे. उधार दिलेले पैसे परत मागितल्याचा राग आल्याने कुऱ्हाडीचे वार करून ही निर्घृण हत्या करण्यात आली आहे. फुरसुंगीतील (Fursungi) पापडेवस्ती येथील धनराज डेअरी येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. युवराज बाबुराव जाधव (वय 34) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे वडिल बाबुराव माणिक जाधव (वय 55) यांनी फिर्याद दिली आहे. तर गणेश सुरेश खरात (वय 35, रा. पापडे वस्ती, फुरसुंगी) याला अटक करण्यात आली आहे. तर आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. अजून त्यांच्यात कोणता वाद होता, यासह या प्रकरणाचा तपास आता पोलीस करीत आहे.

20 हजार रुपये होते उधार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची दुध डेअरी आहे. त्यांचा मुलगा त्यांना व्यवसायात मदत करतो. तर आरोपी गणेश हा मिळेल तशी मोलमजुरीची कामे करतो. त्याने फिर्यादीचा मुलगा युवराज याच्याकडून 20 हजार रुपये उधार घेतले होते. युवराज हा गणेशकडे दिलेले पैसे मागत होता. दरम्यान, रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गणेश हा युवराज याच्या घराबाहेर आला होता. तेव्हा युवराजने पुन्हा एकदा गणेशकडे पैशासाठी तगादा लावला.

डोक्यावर वार

नेहमी पैसे मागत असल्याचा त्याला राग आल्याने गणेशने जवळील कुऱ्हाडीने युवराजच्या डोक्‍यावर सपासप वार केले. युवराजच्या डोक्‍यावर, चेहऱ्यावर, मानेवर आणि तोंडावर गंभीर जखमा होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हडपसर पोलीस पुढील तपास करत आहेत.

आणखी वाचा :

Video : एकवीरा देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची कार तीनवेळा झाली पलटी; लोणावळ्यातला थरार CCTVत कैद

Nanded | Sanjay Biyani हत्याकांड, नांदेड एकटवटलं, अंत्ययात्रा रोखली, आरोपींना तत्काळ अटकेची मागणी

Petrol diesel price hike : …अन्यथा कर्मचाऱ्यांना गमवावा लागेल रोजगार! काय म्हणणं आहे महापेट्रो डिलर्स असोसिएशनचं?