पुणे पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रवादी आक्रमक, सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

| Updated on: Aug 25, 2021 | 10:47 PM

पुणे महापालिकेतील कर्मचारी सातव्या वेतन आयोगापासून अजूनही वंचित आहेत. या मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. पुण्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी याच मागणीला घेऊन पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा द्यावा अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

पुणे पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रवादी आक्रमक, सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी
PUNE
Follow us on

पुणे : पुणे महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा, अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. 10 मार्च 2021 ला पुणे महापालिकेने यासंदर्भातला प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. (NCP demands implementation of seventh pay commission for pune Municipal Corporation workers wrote letter to Eknath Shinde)

सातव्या वेतन आयोगासाठी राष्ट्रवादी आक्रमक

पुणे महापालिकेतील कर्मचारी सातव्या वेतन आयोगापासून अजूनही वंचित आहेत. या मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. पुण्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी याच मागणीला घेऊन पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ द्यावा अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षांनी कंबर कसली

पुण्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने विविध पक्षांनी कंबर कसली असून नागरिकांच्या वेगवेगळ्या प्रश्नावर नेतेमंडळी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. पुणे महानगरपालिकेत एकूण 164 जागा आहेत. बहुमतासाठी राजकीय पक्षाकडे 84 नगरसेवकांचे संख्याबळ असणे गरजेचे आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत बहुमताचा आकडा न गाठता आल्यास भाजप तसेच इतर पक्ष नेमकं काय करतील याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

इतर बातम्या :

संजय राऊत संपादक पदासाठी लायक नाहीत, राणेंचा घणाघात; ‘संभल जाओ, सुधर जाओ’, राऊतांचं प्रत्युत्तर

‘भाजपकडे सध्या सीबीआय आणि ईडी हे दोन चंगू-मंगू’, विनायक राऊतांचा जोरदार टोला

नारायण राणेंच्या अटकेप्रकरणी पाठराखण, गृहराज्यमंत्री म्हणतात ‘पोलिसांनी जबाबदारी योग्य रितीने पार पाडली’

(NCP demands implementation of seventh pay commission for pune Municipal Corporation workers wrote letter to Eknath Shinde)