AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भाजपकडे सध्या सीबीआय आणि ईडी हे दोन चंगू-मंगू’, विनायक राऊतांचा जोरदार टोला

भाजपच्या या आक्रमकतेवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जोरदार टोलेबाजी केलीय. भाजपकडे सध्या सीबीआय आणि ईडी हे दोन चंगू-मंगू आहेत. यांना जे जे लोक विरोध करतील त्यांच्या मागे हे शुक्लकाष्ट लावायचं ही भाजपनं केलेली रणनिती आहे. त्यामुळे त्यांना किती चौकश्या लावायच्या त्या लावू देत, अशा शब्दात राऊत यांनी भाजपचा इशारा उडवून लावलाय.

'भाजपकडे सध्या सीबीआय आणि ईडी हे दोन चंगू-मंगू', विनायक राऊतांचा जोरदार टोला
केंद्रीय मंत्री नारायण राणे, शिवसेना खासदार विनायक राऊत
| Edited By: | Updated on: Aug 25, 2021 | 7:50 PM
Share

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे अटक आणि जामीन प्रकरणात आता भाजप नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात यवतमाळ, नाशिक आणि उत्तर प्रदेशात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर भाजप आमदार आशिष शेलार यांनी अनिल परब यांच्यावर पोलिस कारवाईसाठी दबाव टाकल्याचा आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. भाजपच्या या आक्रमकतेवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जोरदार टोलेबाजी केलीय. भाजपकडे सध्या सीबीआय आणि ईडी हे दोन चंगू-मंगू आहेत. यांना जे जे लोक विरोध करतील त्यांच्या मागे हे शुक्लकाष्ट लावायचं ही भाजपनं केलेली रणनिती आहे. त्यामुळे त्यांना किती चौकश्या लावायच्या त्या लावू देत, अशा शब्दात राऊत यांनी भाजपचा इशारा उडवून लावलाय. (MP Vinayak Raut criticizes BJP over CBI and ED Action)

महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर ईडी आणि सीबीआय चौकशी लावूनही महाविकास आघाडी सरकार आजही भक्कम आहे आणि उद्याही भक्कम राहील, असा दावाही राऊतांनी यावेळी व्यक्त केलाय. विद्यमान मुख्यमंत्र्यांना एक जबाबदार केंद्रीय मंत्र्याने मारण्याची भाषा करणं हे कितपत योग्य आहे, याचा अभ्यास भाजपने करावा. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर खटले दाखल करण्याची भाषा त्यांनी करावी. मात्र, भाजपला जे करायचं ते करण्यासाठी ते मोकळे आहेत. त्यांचा हात कुणीही पकडलेला नाही. परंतू ज्यावेळेस उद्धव ठाकरेंकडून काही राजकीय टीका झाली तेव्हा ते शिवसेना पक्षप्रमुख होते, आता ते मुख्यमंत्री आहेत, असं राऊत म्हणाले.

‘राणे जेवत होते की नाटकं करत होते?’

राणेंची जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात येतानाच अपशकुन झाला आहे. सिंधुदुर्गातून सुरुवात करत असताना आता त्याचा शेवट कसा होईल हे लोकांना माहिती आहे. तसंच जेवताना त्यांना अटक करण्यात आली तेव्हा ते जेवत होते असं सांगितलं जातात. पण त्या थाळीतील पदार्थ पाहिले तर राणे जेवत होते की नाटकं करत होते हे दिसून येईल, असंही विनायक राऊत म्हणाले. ज्यांनी ज्यांनी शिवसेनेशी लढत असताना शिवसेनेचे शेवट करु अशी भाषी केली आहे, त्यांचं कसं विसर्जन झालेलं आहे, शेवट करा झालाय याची अनेक उदाहरणं सध्याच्या राजकारणात आहेत, असा टोलाही विनायक राऊत यांनी राणेंना लगावलाय.

शेलारांकडून राणेंच्या अटकेची सीबीआय चौकशीची मागणी

“केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अटकेसाठी मंत्री अनिल परब (ADV Anil Parab) यांनी दबाव टाकला. त्यांनी काल गृहखात्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तसंच कोर्टाच्या निर्णायाआधी त्यांनी जामीनाचा निवाडा घोषित केला. यातून मुंबई उच्च न्यायालयाची बदानामी आणि अपमान झाला. हे सगळं प्रकरण संशयित आहे. त्यामुळे दबाव टाकणाऱ्या मंत्र्यासह IPS अधिकाऱ्यांची CBI चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.

संबंधित बातम्या :

कोर्टकचेरीनंतर राणेंचा नरमाईचा सूर; मुख्यमंत्र्यांना ‘महाशय’, तर शिवसेनेला ‘विरोधी मित्र’ म्हणाले

अनिल परबांच्या दबावामुळे राणेंवर कारवाई? राणे म्हणतात, आता कोर्टात जाणार

MP Vinayak Raut criticizes BJP over CBI and ED Action

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.