AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनिल परबांच्या दबावामुळे राणेंवर कारवाई? राणे म्हणतात, आता कोर्टात जाणार

राणे यांच्या अटकेसाठी परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याबाबतची परब यांची एक व्हिडीओ क्लिपही समोर आली आहे. त्यावरुन राणे यांनी आता या प्रकरणात आपण कोर्टात जाणार असल्याचा इशारा दिलाय.

अनिल परबांच्या दबावामुळे राणेंवर कारवाई? राणे म्हणतात, आता कोर्टात जाणार
परिवहन मंत्री अनिल परब, केंद्रीय मंत्री नारायण राणे
| Edited By: | Updated on: Aug 25, 2021 | 5:41 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर रात्री उशिरा यांना जामीन मिळाला. मात्र, राज्य सरकारच्या या कारवाईनंतर नारायण राणे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राणे यांच्या अटकेसाठी परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याबाबतची परब यांची एक व्हिडीओ क्लिपही समोर आली आहे. त्यावरुन राणे यांनी आता या प्रकरणात आपण कोर्टात जाणार असल्याचा इशारा दिलाय. त्यामुळे अनिल परब यांच्याविरोधात आता भाजप आक्रमक भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. (Narayan Rane’s warning to Anil Parab)

अनिल परब अधिकाऱ्यांना आदेश देतो की पकडा त्याला. अरे काय सुरु आहे. अनिल परब यांच्या एका प्रकरणाची चौकशी सुरु आहे, त्याचाही आता पाठपुरावा सुरु राहील, असं राणेंनी म्हटलंय. दिशा सालियान प्रकरणात कोण मंत्री उपस्थित होता? त्याचा छडा का लागत नाही. पूजा चव्हाण प्रकरणातही तेच झालं. आता त्या मंत्र्याला अटक होईपर्यंत मागे हटणार नाही. त्या मंत्र्याविरोधात कोर्टात जाणार. लोकशाही मार्गानं लढा देणार. ज्यांनी दिशा सालियानची हत्या केली, ते आत जाईपर्यंत आता स्वस्थ बसणार नाही, अशा सूचक इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. काही गोष्टी करायला हे प्रवृत्त करत आहेत. फार सभ्य आहेत ना, काहीच करत नाहीत ना, आता जनतेला त्यांची करामत कळू द्या, अशा कडक शब्दात राणेंनी शिवसेनेवर हल्ला चढवलाय.

मी असं काय बोललो, त्याचा राग आला?

या सर्व लढ्यात आमच्या विरोधी मित्राने लढा सुरु केला. त्यामध्ये माझा पक्ष माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहीला. त्यामुळे मी जे पी नड्डा, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस तसेच सर्व कार्यकर्त्यांचा आभारी आहे. मी असं काय बोललो होतो त्याचा राग आला? ते वाक्य मी परत बोलणार नाही. भूतकाळात एखादी घटना घडली आणि कसा क्राईम होतो? काय पत्रकारिता आहे? आम्ही पाहिलीच नाही. आक्षेप नाही. शिवसेनेच्या नेत्याने असे शब्द उच्चारले नाहीत?, असा सवाल त्यांनी केला.

नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंना तीन प्रश्न

पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणेंनी उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेवर जोरदार टीका केली. “1 ऑगस्टला बीडीडी चाळीचं पूलबांधणीचा कार्यक्रम होता. त्याअगोदर आमचे आमदार प्रसाद लाड यांनी सेना भवन बद्दल काहीतरी वक्तव्य केलं होतं. आमच्या महिलांवर हात टाकला तर, असं बोलले होते. मी जे बोललो होतो आपल्या देशाला अभिमान नसेल त्याला राष्ट्रीय सण माहीत नसतात. देशाबद्दल अभिमान आहे. त्यामुळे मला सहन झालं नाही. त्यामुळे मी ते बोललो. ते महाशय काय बोलले, म्हणजे मुख्यमंत्री, सेना भवनाबद्दल असं कोणी भाषा करेल तर त्याचं थोबडं तोडा, आदेश दिले. हा क्राईम नाही? 120 बी होत नाही? पत्रकारांनी मला शिकवावं. नाहीतर मी वकीलच डाव्या बाजूला घेऊन बसलो आहे. दुसरं एक वाक्य आहे, योगी साहेबांबद्दल. हा योगी आहे का ढोंगी? चपलाने मारलं पाहिजे. एका मुख्यमंत्र्याला म्हणतात चपलाने मारलं पाहिजे. तिसरा प्रश्न अमित शाह यांच्याबद्दल, मी आणि अमित शाह यांनी बसून ज्या काही पुढच्या वाटचालीबद्दल आखणी केली होती आता मी निर्लज्जपणाने हा शब्द मुद्दाम वापरतो. हा अनपार्लीमेंट शब्द नाही? असे सवाल राणे यांनी केले आहेत.

संबंधित बातम्या :

फडणवीस म्हणाले, राणेंच्या वक्तव्याला समर्थन नाही, आता राणेंचं थेट उत्तर

सिंधुदुर्गात जमावबंदी; राणे म्हणतात, सिंधुदुर्गापासूनच जन आशीर्वाद यात्रा सुरू करणार, त्यात व्यत्यय येणार नाही

Narayan Rane’s warning to Anil Parab

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.