AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंच्या भाषेवर राणेंचे तीन प्रश्न, राणे म्हणतात, योगी, शहांबद्दल ही काय भाषाय?

17 सप्टेंबरपर्यंत कायदेशीर प्रक्रिया असल्यानं त्यासंदर्भात बोलणार नाही. पत्रकारांना त्रास होऊ नये म्हणून पत्रकार परिषदेचे आयोजन केलं आहे. गेले काही दिवस जनआशीर्वाद यात्रा सुरु असताना जे काही टीव्हीवर येत होतं त्याची सगळी माहिती मला मिळत होती.

उद्धव ठाकरेंच्या भाषेवर राणेंचे तीन प्रश्न, राणे म्हणतात, योगी, शहांबद्दल ही काय भाषाय?
नारायण राणे, केंद्रीय मंत्री
| Edited By: | Updated on: Aug 25, 2021 | 5:27 PM
Share

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाड कोर्टाने जामीन दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना तीन महत्त्वाचे प्रश्न विचारले. ठाकरे यांच्या जुन्या वक्तव्यांचा आधार घेत राणे यांनी ठाकरेंवर निशाणआ साधला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच सेनाभवनाबद्दल बोलताना उद्धव ठाकरेंनी वापरलेले शब्द असंसदीय नव्हते का ? असे तीन सवाल राणे यांनी उद्धव ठाकरे यांना केले आहेत. (Narayan Rane press conference live today after relief from High court on his statement on CM Uddhav Thackeray Shiv Sena talks on Yogi Modi BJP jan Ashirwad yatra)

नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंना तीन प्रश्न

पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणेंनी उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेवर जोरदार टीका केली. “1 ऑगस्टला बीडीडी चाळीचं पूलबांधणीचा कार्यक्रम होता. त्याअगोदर आमचे आमदार प्रसाद लाड यांनी सेना भवन बद्दल काहीतरी वक्तव्य केलं होतं. आमच्या महिलांवर हात टाकला तर, असं बोलले होते. मी जे बोललो होतो आपल्या देशाला अभिमान नसेल त्याला राष्ट्रीय सण माहीत नसतात. देशाबद्दल अभिमान आहे. त्यामुळे मला सहन झालं नाही. त्यामुळे मी ते बोललो. ते महाशय काय बोलले, म्हणजे मुख्यमंत्री, सेना भवनाबद्दल असं कोणी भाषा करेल तर त्याचं थोबडं तोडा, आदेश दिले. हा क्राईम नाही? 120 बी होत नाही? पत्रकारांनी मला शिकवावं. नाहीतर मी वकीलच डाव्या बाजूला घेऊन बसलो आहे. दुसरं एक वाक्य आहे, योगी साहेबांबद्दल. हा योगी आहे का ढोंगी? चपलाने मारलं पाहिजे. एका मुख्यमंत्र्याला म्हणतात चपलाने मारलं पाहिजे. तिसरा प्रश्न अमित शाह यांच्याबद्दल, मी आणि अमित शाह यांनी बसून ज्या काही पुढच्या वाटचालीबद्दल आखणी केली होती आता मी निर्लज्जपणाने हा शब्द मुद्दाम वापरतो. हा अनपार्लीमेंट शब्द नाही? असे सवाल राणे यांनी केले आहेत.

मी असं काय बोललो होतो त्याचा राग आला?

“या सर्व लढ्यात आमच्या विरोधी मित्राने लढा सुरु केला. त्यामध्ये माझा पक्ष माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहीला. त्यामुळे मी जे पी नड्डा, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस तसेच सर्व कार्यकर्त्यांचा आभारी आहे. मी असं काय बोललो होतो त्याचा राग आला? ते वाक्य मी परत बोलणार नाही. भूतकाळात एखादी घटना घडली आणि कसा क्राईम होतो? काय पत्रकारिता आहे? आम्ही पाहिलीच नाही. आक्षेप नाही. शिवसेनेच्या नेत्याने असे शब्द उच्चारले नाहीत?” असा सवाल नारायण राणे यांनी केला.

काही जण माझ्या चांगुलपणाचा, मैत्रीचा फायदा उठवतात

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्रकार परीषद सुरु झाली आहे. काल मी रत्नागिरीतून महाड कोर्टात जाऊन पहाटे पाच वाजता मुंबईत पोहोचलो. महाड आणि मुंबई हायकोर्टात माझ्या बाजूनं निकाल लागला आहे. दोन्ही कोर्टात माझ्या बाजूनं निकाल लागल्यानं देशात कायद्याचं राज्य आहे. 17 सप्टेंबरपर्यंत कायदेशीर प्रक्रिया असल्यानं त्यासंदर्भात बोलणार नाही. पत्रकारांना त्रास होऊ नये म्हणून पत्रकार परिषदेचे आयोजन केलं आहे. गेले काही दिवस जनआशीर्वाद यात्रा सुरु असताना जे काही टीव्हीवर येत होतं त्याची सगळी माहिती मला मिळत होती. काही जण माझ्या चांगुलपणाचा, मैत्रीचा फायदा उठवतात हे माझ्या लक्षात आलं आहे. त्यासंदर्भात काही बोलणार नाही, असे राणे म्हणाले.

मोदींनी जनतेचे आशीर्वाद मागण्यास सांगितलं, परवापासून पुन्हा यात्रा सुरु होईल

तसेच, गेले काही दिवस माझा जनआशीर्वाद यात्रा चालू असताना जे काही प्रसारमाध्यमात येत होतं त्याची सगळी माहिती मिळत होती. काहीजण माझ्या चांगूलपणाचा फायदा घेतात हे लक्षात आलं. त्यावर मी आज काही बोलणार नाही. आमची यात्रा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होऊन सात वर्ष झाली. या सातवर्षात त्यांनी केलेलं काम सर्वसामान्य शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवलं ते सांगण्यासाठी ही यात्रा होती. दुसरं म्हणजे देशाच्या मंत्रिमंडळात मला कॅबिनेट मंत्री म्हणून घेतलं. राज्यातील आणि देशातील अनेक खासदारांना मंत्री बनवण्यात आलं. त्यांना मोदींनी सर्वांना आपापल्या राज्यात जनतेचं आशीर्वाद मागण्यास सांगितलं. तसंच तुमच्या खात्याला सुरुवात करण्यास सांगितलं. त्यानुसार आम्ही 19 तारखेपासून जनआशीर्वाद सुरु केली. मी कालपर्यंत यात्रेत होतो. दोन दिवस गॅप ठेवलाय. परवापासून यात्रा सुरु होईल, असे भाष्य राणे यांनी केले.

मला कोणी काही करु शकत नाही, तुमच्या कुठल्याच प्रक्रियेला घाबरत नाही

चिपळूणला झेंडो दाखवले. मी म्हटलं ठीक आहे भगवे झेंडे आहेत. शिवसैनिकांची प्रचंड गर्दी? 17 माणसं होती. मी मुद्दाम मोजली. त्यापुढे आम्ही गेलो. तिथे एका कोपऱ्यामध्ये आवाज बाहेर येत नव्हते तरी काढत होते. 13 माणसं. आमच्या घरावर किती आले ते मी मोजले नाहीत. पण पराक्रमी लोकांचे व्हिडीओ क्लीप मिळतील. आम्ही तिघंही मुंबईत नव्हतो. पोलिसांनी जे कारायचं ते केलं. तुम्हाला घरं नाहीत, मुलंबाळं नाहीत? एवढंच आठवणीत ठेवा. तुम्ही कोणी मला काही करु शकत नाही. तुमच्या कुठल्याच प्रक्रियेला मी घाबरत नाही. शिवसेना वाढली त्यामध्ये माझा मोठा सहभाग आहे. त्यावेळी आताचे कुणी नव्हते. अपशब्द बोलणारेही नव्हते. कुठे होते तेही माहिती नाही. म्हणून त्यांना आंदोलन करायचं ते करु दे. पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था पाहत राहावं, असा सल्ला राणे यांनी पोलिसांना दिला.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

शरद पवारांना कानशिलात मारली, तरीही त्यांनी संयम पाळला, राणेंना डिफेंड करण्यासाठी शेलारांकडून दाखला

Exclusive Video | नारायण राणेंच्या अटकेसाठी अनिल परबांचा फोन, पोलिसांवर दबाव?

(Narayan Rane press conference live today after relief from High court on his statement on CM Uddhav Thackeray Shiv Sena talks on Yogi Modi BJP jan Ashirwad yatra)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.