AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्जिकल स्ट्राईकचा साक्षीदार लाल महालसुद्धा पुण्यात, पुणे एअरपोर्ट अथॉरिटीला विसर पडला की काय? अमोल कोल्हेंचा सवाल

राष्ट्रवादी कांग्रेसचे (NCP) शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी पुणे एअरपोर्ट अथॉरिटीला ट्विटरवरुन काही प्रश्न विचारले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्जिकल स्ट्राईकचा साक्षीदार लाल महालसुद्धा पुण्यात, पुणे एअरपोर्ट अथॉरिटीला विसर पडला की काय? अमोल कोल्हेंचा सवाल
डॉ. अमोल कोल्हे, खासदार
Reporter Ashwini Satav Doke
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Dec 04, 2021 | 1:10 PM
Share

पुणे: राष्ट्रवादी कांग्रेसचे (NCP) शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी पुणे एअरपोर्ट अथॉरिटीला ट्विटरवरुन काही प्रश्न विचारले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्जिकल स्ट्राईक केलेला लाल महालसुद्धा पुण्यात आहे, अशी आठवण त्यांनी करुन दिली आहे. पुणे विमानतळावर पेशवाईची चित्रे दिसतात पण मग शिवरायांचे कर्तृत्व का दिसत नाही असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.

खासदार अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?

पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लालमहालसुद्धा आहे, सिंहगडही आहे आणि याच जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढू तुळापूर देखील आहे याचा पुणे एअरपोर्ट अथॉरिटीला विसर पडला की काय?

पुणे विमानतळावर काढण्यात आलेल्या पेटिंग्जबद्दलची सोशल मिडियावरची खासदार अमोल कोल्हें यांची पोस्ट चर्चेत आहे. पुणे विमानतळावर पेशवाईची चित्रे दिसतात पण मग शिवरायांचे कर्तृत्व का दिसत नाही असा सवाल त्यांनी ट्विटरवरुन पुणे एअरपोर्ट अथॉरिटी विचारला आहे. विमानतळावरील पेंटिंग्जसोबतचा सेल्फी आणि एक फोटोही कोल्हेंनी ट्विटरवर शेअर केला आहे.

शिवाजी महाराजांनी सर्जिकल स्ट्राईक केलेला लालमहाल पुण्यातच

ज्या पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा‌ जन्म झाला तो किल्ला, पुण्यात‌ त्यांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली तो लाल महाल, तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष असणारा सिंहगड आणि छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढू तुळापूर देखील आहे, अशी आठवण अमोल कोल्हे यांनी करुन दिली आहे.

शिवाजी महाराजांचं कर्तृत्व पुणे विमानतळावर का दिसत नाही. शिवाजी महाराज, संभाजी‌ महाराज यांचा इतिहास सांगणारं विमानतळावर काहीच नाही, याबद्दल अमोल कोल्हे यांनी नाराजी व्यक्त केलीय. अमोल कोल्हे यांनी या ट्विटमध्ये केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, पुण्याचे खासदार गिरीश बापट, पुणे एअरपोर्ट अथॉरिटीला टॅग केलं आहे.

इतर बातम्या:

Leopards in Katraj Ghat: कात्रज घाटात बिबट्याचा मुक्तसंचार ; संरक्षक भिंतीवर बसलेला बिबट्या कॅमेऱ्यात कैद

omicron alert | पिंपरीत नायजेरियाहून आलेल्या आणखी एकाला कोरोनाची लागण

NCP MP Amol Kolhe tweet and asked question over Chhatrapati Shivaji Maharaj history related paintings not available on Pune Airport

Follow Us
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी