‘मी कुठे कमी पडले? …. जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादीत नाराजी नाट्य

| Updated on: Dec 13, 2021 | 2:07 PM

जिल्ह्या बँकेच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर नागवडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्याबरोबर असलेले फोटो पोस्ट करत, 'मी कुठे कमी पडले?'   असे कॅप्शन या फोटोला दिले आहे. वैशाली नागवडे यांनी पुणे जिल्हा परिषद सदस्या, पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या जवळच्या सहकारी म्हणून ओळखल्या जातात.

मी कुठे कमी पडले? .... जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादीत नाराजी नाट्य
vaishali nagwade NCP
Follow us on

पुणे – पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नुकतीच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत दौंडमधून बँकेचे विद्यमान अध्यक्ष र रमेश थोरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं दौंडमधून जिल्हा बँकेसाठी इच्छुक असलेल्या महिला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे नाराज झाल्याचे समोर आले आहे.

नाराजी झाली उघड 

जिल्ह्या बँकेच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर नागवडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्याबरोबर असलेले फोटो पोस्ट करत, ‘मी कुठे कमी पडले?’   असे कॅप्शन या फोटोला दिले आहे. वैशाली नागवडे यांनी वैशाली नागवडे यांनी पुणे जिल्हा परिषद सदस्या, पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या जवळच्या सहकारी म्हणून वैशाली नागवडे ओळखल्या जातात. याबाबत वैशाली म्हणाल्या की , ”त्यांनी मी पक्षावर नाराज नसल्याचे सांगितले. गेली अनेक वर्षे पक्षात सक्रिय राहून संधी मिळालेली नाही, त्यामुळे मी कुठे कमी पडले हा सवाल मी स्वत:लाच विचारल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे.

या[पूर्वीही वैशाली यांनी आमदार की लढवण्याची इच्छा व्यक्त करत तिकीटाची मागणी केली होती. मात्र तेव्हाही त्यानं डावलण्यात आले होते. मात्र वैशाली यांच्या पोस्टाची चर्चा दौंडसह राष्ट्रवादीच्या राजकारणात चांगलीच रंगली आहे.

VIDEO: एसटीला फायद्यात आणण्यासाठी राज ठाकरेंनी सांगितला उपाय; ठाकरे सरकार निर्णय घेणार?

PM at Kashi Vishwanath Mandir | काशी विश्वनाथ मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते पूजा

सोयाबीन प्रमाणेच कापसाची अवस्था, शेतकऱ्यांच्या मनात नेमंक आहे तरी काय?