
कामाच्या बाबतीत आपला कुणी हात धरू शकत नाही. कारण मी कामाचा माणूस आहे, असे अजितदादा पवार यांनी काल पुन्हा एकदा विधान केले. गेल्या काही दिवसात त्यांनी मी कामाचा माणूस आहे, असे विधान वारंवार केला आहे. नेमका हा इशारा आहे की टोला हे त्यांच्या विरोधकांनाच माहिती, पण दादांनी कामात आपण वाघ आहोत असे ठणकावून सांगितले आहे. बारामती येथे काल बारामती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. कामाच्या बाबतीत आपला कुणी हात धरू शकत नाही कारण मी कामाचा माणूस आहे ही बाब मी छातीठोकपणे सांगतो, असं अजितदादा पवार म्हणाले. मुख्यमंत्री, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याच्या पूरपरिस्थिवर लक्ष ठेऊन आहोत. शिव शाहू फुले आंबेडकर विचारांनी आम्ही पुढे चाललो आहे. सरकार अनेक योजनेतून जनतेला कर्ज देण्याचे कामं करीत आहे, असे ते म्हणाले.
लक्ष्मण हाकेंवर केली टीका
मराठा समाजाला अण्णासाहेब पाटील महामंडळातून मोठ्या प्रमाणावर कर्ज मंजूर करण्यात आल्याचा आरोप प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला होता. ओबीसी नेते हाके हे गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबियांवर सातत्याने टीका करत आहेत. त्यांच्या या आरोपाचा अजितदादांनी त्यांचे नाव न घेता खरपूस समाचार घेतला. कोणीतरी येतं. कोणीतरी त्यांच्या कानाशी लागतं. मग ही व्यक्ती अर्धवट माहिती घेऊन भाषण करते. त्यांना वस्तूस्थिती माहिती नसते. मी कधीही जातीपातीचा विचार केलेला नाही. ठराविक समाजाला कर्ज मिळावं, इतरांना वंचित ठेवलं जावं, असं कधी आमच्या मनातही येत नाही, असे अजितदादांनी हाकेंना ठणकावले.
पूरग्रस्तांना मदत करणार
या सभेत राज्यातील पूरस्थिती आणि मदत यावर त्यांनी मत मांडलं. राज्यात अजून चार दिवस रेड अलर्ट राहील. नांदेडसह अनेक जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. नैसर्गिक आपत्तीसमोर आपण कितीही ताकदवान असलो तरी काही वेळा आपण असहाय्य ठरतो. पण सरकार या कालात मदतीला धावून आल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
मी कामाचा माणूस
कामाच्या बाबतीत आपला कुणी हात धरू शकत नाही. कारण मी कामाचा माणूस आहे, असे अजितदादा पवार यांनी काल पुन्हा एकदा विधान केले. बारामतीकरांनी मला खासदार केले. आमदार केले. मला मागील आमदारांवर टीका करायची नाही. त्यांना राज्य आणि देशाचा व्याप होता. प मला फक्त बारामतीचा विचार करायचा आहे. मी तुलना करणार नाही. पण पिकत तिथं ते विकत नाही हे लक्षात ठेवा. मी प्रतिनिधित्व करायचं बंद केल्यावरच लोकांना कळेल मी खरा आमदार काय असतो, असे अजितदादा म्हणाले.