Sinhagad Fort : 15 ऑगस्टला ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर नको ते घडलं, कपडे फाटेपर्यंत मारामारी आणि नंतर महिला, मुलींसोबत..खरच लाज वाटते

Sinhagad Fort : महाराष्ट्राच्या इतिहासात सिंहगड किल्ल्याचं ऐतिहासिक महत्व आहे. सिंहगड किल्ला हा पुण्याचं वैभव आहे. पण 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी सिंहगड किल्ल्यावर भ्रमंतीसाठी आलेल्या पर्यटकांना धक्कादायक अनुभव आला.

Sinhagad Fort : 15 ऑगस्टला ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर नको ते घडलं, कपडे फाटेपर्यंत मारामारी आणि नंतर महिला, मुलींसोबत..खरच लाज वाटते
Sinhagad Fort
| Updated on: Aug 17, 2026 | 9:29 AM

महाराष्ट्राच्या इतिहासात सिंहगड किल्ल्याचं ऐतिहासिक महत्व आहे. सिंहगड किल्ला हा पुण्याचं वैभव आहे. पण 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी सिंहगड किल्ल्यावर भ्रमंतीसाठी आलेल्या पर्यटकांना धक्कादायक अनुभव आला. स्वातंत्र्यदिनी सिंहगड किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांना असुरक्षित वातावरणाचा सामना करावा लागला. सिंहगड किल्ल्यावर करण्यात आलेल्या गर्दी व्यवस्थापनाचा पूर्णपणे फज्जा उडाला. 15 ऑगस्ट रोजी किल्ले सिंहगडावर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. दोन गटांमधील या राड्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. परस्परांचे कपडे फाडले. इतक्यावरच हे समाजकंटक थांबले नाहीत, तर त्यांनी तिथे परस्परांवर दगडफेक केली. त्यामुळे सिंहगड भ्रमंतीसाठी आलेल्या पर्यटक धस्तावले. महिला, मुली घाबरल्या.

या ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर काही नको त्या गोष्टी सुद्धा घडल्या. काही समाजकंटकांनी या गर्दीचा फायदा घेतला तरुण महिला, मुली यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. महिला-मुलींचा छळ केला. धक्कादायक बाब म्हणजे सिंहगडावर हे सर्व घडत असताना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तिथे पोलीस किंवा कोणीच सुरक्षारक्षक नव्हते. काही स्थानिक मंडळाचे कार्यकर्ते गुटखा खाणाऱ्यांना 100 उठा-बशा काढण्याची शिक्षा देण्यात व्यस्त होते. गर्दी नियंत्रण आणि पर्यटक सुरक्षेला प्रथम प्राधान्य असलं पाहिजे, पण हे सर्व तिथे का नव्हतं? असा प्रश्न प्रत्यक्षदर्शींनी विचारला आहे. हाणामारी मध्ये काही महिला सुद्धा जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. भर पावसात झालेल्या हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हाणामारीचे कारण अस्पष्ट, हवेली पोलिसांकडून संबंधित घटनेची दखल.

स्वातंत्र्यदिनी किल्ल्यावर नको ते घडलं

ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर उद्या एखादी मोठी दुर्घटना घडण्याआधी वनखातं किंवा पोलीस प्रशासन काही कारवाई करणार आहे का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि महान योद्धे तानाजी मालुसर यांच्या शौर्यगाथेसाठी सिंहगड किल्ला ओळखला जातो. तिथे अशा प्रकारे महिला-मुलींशी छेडछाड होत असेल तर ही खूप गंभीर बाब आहे. सिंहगड किल्ल्याचं सौंदर्य पावसाळ्यात विशेष खुलून येतं. त्यामुळे पावसाळ्यात गडावर पर्यटकांची मोठी गर्दी उसळते. हे दरवर्षीच चित्र आहे. पण यंदा स्वातंत्र्यदिनी किल्ल्यावर नको ते घडलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us