AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांना मोठी खुशखबर! थेट खात्यावर पैसे जमा होणार…. देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वितरण

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2026, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफीचा तिसरा हप्ता वितरित

कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांना मोठी खुशखबर! थेट खात्यावर पैसे जमा होणार.... देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वितरण
farmer loan waiverImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 01, 2026 | 6:26 PM
Share

Farmer Loan Waiver : राज्यात सध्या दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. सुरुवातीला काही तालुके दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून वगळण्यात आले होते. आता वगळलेल्या तालुक्यांचाही दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलंय. आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वेगवेगळ्या उपायोजना केल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांना परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. पंचनामे सुरू झाले आहेत. असे असतानाच आता शेतकरी कर्जमाफीबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय.

नेमका काय निर्णय घेण्यात आला?

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2026 बाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफीचा तिसरा हप्ता वितरित करण्यात आला आहे. या तिसऱ्या हप्त्यामध्ये 3.27 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 3161 कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण 15.86 लाख कर्जखात्यावर राज्य सरकारने 13,276 कोटी रुपये लाभ वितरित केले आहेत.

सरकारने आणखी काय काय निर्णय घेतले?

दुसरीकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने आणखी काही निर्णय घेतले आहेत. सरकारने शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या कर्जवसुलीला स्थगिती देण्यात आलीय. तसेच पंचनामे झाल्यानंतर सरकार शेतकऱ्यांना आणखी काही मदत देणार आहे. तसेच सरकारने दुष्काळाची घोषणा केल्यानंतर वीजबिलात विशेष सूट दिली आहे. शेतीपंपाची वीजजोडणीही खंडित करू नये असा आदेश देण्यात आलाय. दुष्काळाची धग लक्षात घेऊन सरकारने पिण्याच्या पाण्याची तसेच चाऱ्याची सोय करावी असे निर्देश दिले आहेत. सोबतच जलसंधारणाचे काम हाती घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी असेही निर्देश प्रशासनाला दिलेले आहेत. खरीप हंगाम हातातून गेला आहे. परंतु रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, असेही सरकारने बँकांना सांगितले आहे.

2027 सालासाठीही सरकारचे नियोजन सुरू

दरम्यान, दुष्काळ निवारणासाठी आणखी काय काय करता येईल यासाठी सरकारकडून अभ्यास केला जातोय. आता शेतकऱ्यांना, मजुरांना जास्तीत जास्त कसा फायदा मिळेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आगामी वर्षात म्हणजेच 2027 सालीदेखील एल निनोचा परिणाम राहण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनेही सरकारचे नियोजन चालू आहे.

Follow Us
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर