पिंपरी-चिंचवडमधील घरगुती गॅसची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांच्या बेड्या, तब्बल 22 आरोपी ताब्यात

| Updated on: Feb 20, 2021 | 1:07 PM

पिंपरी-चिंचवडमधील घरगुती गॅसची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पिंपरी-चिंचवडमधील घरगुती गॅसची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांच्या बेड्या, तब्बल 22 आरोपी ताब्यात
गॅसचोरी करणारी पिंपरी चिंचवडमधील गँग
Follow us on

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील घरगुती गॅसची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शहरातील सांगवी परिसरातून घरगुती गॅसची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Pimari Chinchwad Police Action Against Gas theft gang)

हे सर्व आरोपी सांगवी परिसरातील भैरवनाथ गॅस एजन्सीमधील कर्मचारी असून एकून 22 जण पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्यांच्याकडून 14 टेम्पोमध्ये 312 गॅसच्या भरलेल्या आणि रिकाम्या टाक्या सामाजिक सुरक्षा पथकाने ताब्यात घेतल्या आहेत.

ताब्यात घेतलेल्या टोळीकडून अंदाजे 312 घरगुती गॅस हस्तगत केले आहेत. मुख्य गोडाऊनमधून इतर दुसऱ्या गोडाऊनमध्ये गॅस सिलेंडर घेऊन जाऊन तिथे कनेक्टरच्या साहाय्याने एका गॅस मधून एक ते दोन किलो गॅस दुसऱ्या मोकळ्या गॅस सिलेंडरमध्ये काढून घेत असत. असं करत पुन्हा, ते गॅस ग्राहकांना विकायचे.

(Pimari Chinchwad Police Action Against Gas theft gang)

हे ही वाचा :

पनवेलमध्ये दुहेरी हत्याकांड, लग्नास नकार दिल्यानं मुलीसह आईची हत्या

डोक्यात वरवंटा घालून सासूचा खून, नंतर फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न