AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी अपडेट! आयुष कोमकर प्रकरणात रेकी, टेहळणी आणि शस्त्र… काय घडलं? पोलिसांचा रिल्स तयार करणाऱ्यांबाबतही निर्णय काय?

Bandu Andekar Arrest: पुण्यातील आयुष कोमकर प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली असून सहा जणांना अटक केली आहे. या प्रकरणात त्यांनी आंदेकर टोळी विरोधात मोठी कारवाई केली आहे.

मोठी अपडेट! आयुष कोमकर प्रकरणात रेकी, टेहळणी आणि शस्त्र... काय घडलं? पोलिसांचा रिल्स तयार करणाऱ्यांबाबतही निर्णय काय?
Ayush KomkarImage Credit source: Social Media
| Updated on: Sep 09, 2025 | 1:39 PM
Share

Bandu Andekar Arrest: पुण्यात शुक्रवारी 5 सप्टेंबर रोजी, गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आंदेकर टोळीने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या हत्येचा बदला घेतला. त्यांनी वनराज यांचा खून करणारा आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या केली. आयुष कोमकर क्लास सुटल्यानंतर पार्किंगमध्ये येताच आंदेकर टोळीच्या अमन पठाण आणि यश पाटील यांनी त्याची गोळ्या घालून हत्या केली. या प्रकरणानंतर पुणे हादरले होते. आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

बंडू आंदेकरच्या मुलीला अटक

पोलिसांनी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरला अटक केली आहे. त्यासोबतच त्याच्या सहा सहकाऱ्यांना देखील बेड्या घालण्यात आल्या आहेत. आरोपी पळून जात असताना पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईत बंडू आंदेकरची मुलगी आणि दोन नातू देखील असल्याचे समोर आले आहे. तसेच पोलिसांनी आयुषच्या हत्येचा रिल्स तयार करणाऱ्यांबाबतही मोठा निर्णय निर्णय घेतला आहे.

वाचा: मंडळाच्या कार्यकर्त्यांना माज चढला, तोच उतरविण्यासाठी…; लालबाग राजाच्या विसर्जनानंतर कोणी पाठवलं CMला पत्र

13 पैकी 8 आरोपींना अटक

आयुष कोमकर हत्या प्रकरणाबाबत अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, आयुष कोमकर खून प्रकरणात 13 पैकी 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात यश पाटील, अमन पठाण, अमित पाठोळे, सुजल मेरगुळ यांचा सक्रिय सहभाग होता. यश पाटील, अमन पठाण यांनी आयुषवर गोळ्या झाडल्या होत्या. अमित पाठोळे, सुजल मेरगुळ या दोघांनी या हत्येसाठी शस्त्र पुरवली होती तसेच रेकी करणे, टेहळणी करणे हा यांचा महत्त्वाचा भाग होता.

पुढे ते म्हणाले, या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी निलंजय वाडेकर यांना अटक करण्यात आली आहे. सोमनाथ गायकवाड यांचे कुटुंबीय हे मूळ टार्गेट होते. सोशल मीडियावर या गँग संदर्भात कोणी रिल्स अपलोड केलेल्या असतील त्यांच्यावर पण पोलिसांकडून कारवाई होणार. अजून 5 आरोपी फरार आहेत त्यांचा आम्ही शोध घेत आहोत. या गँग विरोधात कोणाला काही तक्रार करायची असेल तर त्यांनी पोलिसात तक्रार करावी.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.