लोणावळ्यात पर्यटकांना दणका; पोलिसांकडून 1 लाख 75 हजारांची दंडवसुली

| Updated on: Aug 02, 2021 | 9:30 AM

Pune | शनिवार आणि रविवारी या दोन दिवशी ही कारवाई करण्यात आली. वीकेंड लॉकडाऊन असल्याने लोणावळा पोलिसांनी जागोजागी नाकबंदी करत अनेक पर्यटकांना माघारी धाडले.

लोणावळ्यात पर्यटकांना दणका; पोलिसांकडून 1 लाख 75 हजारांची दंडवसुली
पुण्यात पर्यटकांवर कारवाई
Follow us on

पुणे- लोणावळा परिसरात वीकेंड लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांकडून मोठ्याप्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी या भागात फिरण्यासाठी आलेल्या 334 पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केली. या माध्यमातून शासनाला 1 लाख 75 हजाराचा महसूल मिळाला आहे.

शनिवार आणि रविवारी या दोन दिवशी ही कारवाई करण्यात आली. वीकेंड लॉकडाऊन असल्याने लोणावळा पोलिसांनी जागोजागी नाकबंदी करत अनेक पर्यटकांना माघारी धाडले. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी पुण्यातील धबधबे आणि इतर पर्यटनस्थळांच्या परिसरातही अशीच कारवाई केली होती. जुन्नरमधील कांचन धबधब्यावर आलेल्या 57 जणांवर कारवाई करण्यात आली होती. च्याकडून 29 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पहिलीच कारवाई असल्याने केवळ दंडात्मक तरतूद करून सोडून देण्यात आले आहे. यापुढे सरसकट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा जुन्नर पोलिसांनी दिला होता.

पुण्यात झिका विषाणूचा पहिला रुग्ण

पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात झिका व्हायरसचा संसर्ग असलेला पहिला रुग्ण आढळून आल्याने त्यामुळे येथील आरोग्य विभागाच्या यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. बेलसर येथील एका 50 वर्षीय महिलेला झिका या विषाणूजन्य आजाराची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्रात झिका विषाणू आढळलेली ही पहिलाच रुग्ण आहे.

झिका विषाणूचा संसर्ग झालेली ही महिला चिकुन गुनिया बाधित देखील असल्याचे स्पष्ट झाले असल्याने हा मिश्र विषाणू संसर्ग आहे. मात्र, राज्यात पहिल्यांदाच झिका या विषाणूचा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

राज्यस्तरीय शिघ्र प्रतिसाद पथकाने बेलसर गावातील परिस्थितीची पाहणी केली. तशेच स्थानिक प्रशासनाच्या वतीने गावात 10 टीम च्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू करण्यात आली आहे. याशिवाय फॉगिंग मशीन सहाय्याने धुरळणी करून पाणी साठवण्याच्या ड्रम मध्ये गप्पी मासे सोडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. झिका विषाणूने बाधित असलेली महिलेची तब्येत चांगली असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उज्वला जाधव यांनी सांगितले होते.

संबंधित बातम्या:

पावसाळी सहल महागात, पुण्यात कांचन धबधब्यावर गर्दी, पर्यटकांकडून दंडवसुली

पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळावर आजपासून कलम 144, पर्यटनासाठी बाहेर पडाल तर कारवाई होणारच!

सिंहगड, खडकवासला धरणावर जाताय? गर्दी करणाऱ्या पर्यटकांवर दंडासह गुन्हाही दाखल