AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळावर आजपासून कलम 144, पर्यटनासाठी बाहेर पडाल तर कारवाई होणारच!

विकेंड लॉकडाऊन असूनही पर्यटन स्थळी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याचे लक्षात येताच आज पासून पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर 144 कलम लावण्यात आलंय.

पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळावर आजपासून कलम 144, पर्यटनासाठी बाहेर पडाल तर कारवाई होणारच!
पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळावर आजपासून 144 कलम लावण्यात आलेले आहे.
| Edited By: | Updated on: Jul 17, 2021 | 2:55 PM
Share

पुणे : बेशिस्त नागरिकांना धडा शिकवण्यासाठी पुणे पोलिसांची मोहीम सुरु झालीय. विकेंड लॉकडाऊन असूनही पर्यटन स्थळी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याचे लक्षात येताच आज पासून पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर 144 कलम लावण्यात आलंय.

पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर 144 कलम

ज्या जिल्ह्यांमध्ये किंवा ज्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी विकेंड लॉकडाऊन सुरु आहे. परंतु नागरिकांना याचं कसलंही भान राहिलं नाहीय. लॉकडाऊन असून देखील नागरिक मोठ्या संख्येने विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. अशात शासन आणि प्रशासन कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात यावी म्हणून विविध प्रयत्न करत आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांवर आजपासून कलम 144 लागू करण्यात आलेला आहे.

खडकवाल्यात नाकाबंदी, गाड्यांची तपासणी

लॉकडाऊन असूनही पुण्यातील खडकवासला येथे पर्यटक मोठ्या संख्येने आले आहेत. या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली असून नेमक्या कोणत्या कारणास्तव नागरिक घराबेहर पडले आहेत, याची ते माहिती घेत आहेत. तसंच गाड्यांची तसापणी करत आहेत.

तर कारवाईला सामोरं जावंच लागेल!

…पुणे जिल्ह्यात अनेक किल्ले आहेत. तसंच प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण लोणावळा-खंडाळाही आहे. राज्यातल्या महत्त्वाच्या शहरातून वीकेण्ड एन्जॉय करण्यासाठी पर्यटकांची पुण्याकडे ओढ असते. असे पर्यटक जर घराबाहेर पडणार असतील तर त्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल म्हणून सावधान…!

(Section 144 on all tourist destinations in Pune district from today)

हे ही वाचा :

मालकाच्या मुलीवर कामगाराचा जीव जडला, मालक चिडला, दुहेरी हत्याकांडाने चाकण हादरलं

पुरंदरमध्ये मुळशी पॅटर्न, कुख्यात गुंड गणेश रासकरची हत्या

जेजुरी गडाला पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करुन देणार, उपमुख्यमंत्री अजितदादांची ग्वाही

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.