AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेजुरी गडाला पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करुन देणार, उपमुख्यमंत्री अजितदादांची ग्वाही

जेजुरी गडाला आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज पुण्याच्या बैठकीत बोलताना दिली.

जेजुरी गडाला पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करुन देणार, उपमुख्यमंत्री अजितदादांची ग्वाही
अजित पवार
| Edited By: | Updated on: Jul 16, 2021 | 2:34 PM
Share

पुणे : जेजुरी तीर्थक्षेत्र विकासासाठी तयार करण्यात आलेल्या 349 कोटी रुपयांच्या आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यातील जतन व संवर्धन, परिसर व्यवस्थापन, जलव्यवस्थापन आदी विकासकामांसाठी मान्यता देण्यात आली, तसेच पहिल्या टप्प्यांतील विकास कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखडा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार संजय जगताप, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, तथा वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अजित पवार काय म्हणाले?

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, “जेजुरी गडाला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. हे जागृत देवस्थान असून इथे राज्यातून आणि परराज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. जेजुरीच्या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून विकासाचे नियोजन करा. विकास कामे करताना कमीत कमी वेळेत काम पूर्ण होईल याची दक्षता सर्व विभांगांनी घ्यावी. विश्वस्त आणि स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन सर्व विभागांनी विकासाची कामे करावीत”. मंदिर परिसराचा जीर्णोध्दार करताना मूळ मंदिरामध्ये बदल न होऊ देता जुन्या पद्धतीचा दृष्टीकोन समोर ठेऊन विकास कामे करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

तीर्थक्षेत्र विकासामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळेल, तसेच भाविक येण्याचे प्रमाण वाढेल. पाण्याच्या साठवण ठिकाणांची स्वच्छता करुन वेगळी पाईपलाईन करुन त्याचा वापर करता येईल. गडावर उधळली जाणारी हळद रसायन मिश्रीत असल्याने सर्वांच्या आरोग्यासाठी घातक आहे.

रसायन मिश्रीत भंडाऱ्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांबाबत कठोर भूमिका घ्यावी, असे सांगून गडाला शोभेल अशी सीमाभिंत बांधा, पाण्याची टाकी, पदपथ, शौचालय, तलावातील गाळ काढणे, माहिती फलक इत्यादी कामांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी घेतला.

नियोजन विभागाकडून सुविधांबाबत सादरीकरण

यावेळी नियोजन विभागाच्यावतीने गडाचे ऐतिहासिक महत्त्व आणि वास्तूचा इतिहास, यात्रा-उत्सव तसेच दरवर्षी गडावर येणाऱ्या भाविकांची संख्या, आपत्ती निवारण मार्गदर्शक तत्त्वे, संवर्धनासाठी मार्गदर्शक तत्त्वे, कमानी, दीपमाळा व कोटाचा बाहेरच्या भागाची वास्तुसंवर्धनाची गरज, महादरवाजे, पाणीगळती डागडुजी, तुटलेले दगड परत बसविणे, खराब चुन्यांच्या गिलाव्याची डागडुजी, भेगा सांधणे, गडावरील झुडपे, गवत शास्त्रीय पद्धतीने काढणे, हळद व तेलाचे थर काढणे, पर्यटक/भाविकांसाठीच्या सुविधांबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

(Necessary funds will be made available immediately For jejuri gad Says DCM Ajit Pawar)

हे ही वाचा :

8 ते 10 जिल्ह्यात अजूनही संसर्ग, 3 कोटी जादा डोस द्या, मुख्यमंत्र्यांची मोदींकडे मागणी

राज्यमंत्री बच्चू कडूंची नाशिक कोर्टात हजेरी, महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांवर हात उगारल्याचा आरोप

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.