‘मी ज्या रूममध्ये झोपते तिथे…’; मनोरमा खेडकर यांचे कोर्टात पोलिसांवर आरोप

वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांच्या अटकेत असलेल्या आईची यांची पोलीस कोठडी संपली होती. कोर्टात सुनावणीवेळी मनोरमा खेडकर यांनी पुणे पोलिसांवर आरोप केले आहेत. ते आरोप नेमके काय आहेत आणि त्यानंतर कोर्टाने काय निर्णय घेतला जाणून घ्या.

मी ज्या रूममध्ये झोपते तिथे...; मनोरमा खेडकर यांचे कोर्टात पोलिसांवर आरोप
| Updated on: Jul 20, 2024 | 6:43 PM

राज्यातच नाहीतर संपूर्ण देशभरात वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. पूजा खेडकरविरूद्ध आता UPSC ने एफआयआर दाखल केला आहे. इतकंच नाहीतर पूजा खेडकरला कारणे द्या नोटीसही पाठवण्यात आली आहे. तर दुसरीकडे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पूजाची आई मनोरमा खेडकरला अटक केलीये. आज पोलीस कोडठीची तारीख संपल्यावर कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये मनोरमा खेडकरने पुणे पोलिसांवर आरोप केले आहेत.

मला जेवण वेळेवर मिळत नाही. आज मला 9 ला चहा मिळाला आणि जेवण दीड वाजता मिळालं. मी ज्या रूममध्ये झोपते ती रूम ओली असल्याची तक्रार कोर्टामध्ये केली. त्यानंतर कोर्टाने सीसीटीव्ही फुटेज मागवत त्यांना सगळ्या गोष्टी वेळेवर मिळायला हव्या असं सांगितलं आहे. पुढच्या सुनावणीला कोर्ट सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहे.

मनोरमा खेडकरने वापरलेली पिस्तुल फॉरेन्सिकला पाठवली जाणार आहे. मनोरमा खेडकर यांनी फायर केलं होतं का फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये स्पष्ट होणार आहे. कोर्टाने विचारलं की फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये फायर केलंय हे कळत का? पोलिसांना असा सवाल केला. पिस्तुल कुठून घेतली आणि कायदेशीर आहे का हे पण तपासलं जाणार याचाही तपास होणार आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांनी पूजा खेडकरला संपर्क केल्यावर तिचा फोन बंद लागल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. पुजा खेडकरने पुणे जिल्हा अधिकारी सुहास दिवे यांनी छळ केल्याचा आरोप केला होता. पुण्यात प्रशिक्षणार्थी असताना त्यांनी वाशिम येथे बदली करून घेतली होती.

आता पूजाच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. कारण UPSC ने पूजाविरोधात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये तिने आपले नाव, आई-वडिलांचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता आणि ई-मेल आयडी बदलल्याचं म्हटलं आहे. त्यासोबतच तुमची हकालपट्टी का करू नये? अशी कारणे द्या नोटीसही पाठवली आहे. मसुरी येथील अकॅडमीने पूजा खेडकरला 23 जुलैपर्यंत हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत.