
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेक करण्यात आली होती. हा सुनियोजीत हल्ला असल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. पुरोगामी विचारांच्या संघटना आणि त्यांच्या नेत्यांना टार्गेट करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता अजून एका वक्तव्याची भर पडली आहे. गायकवाड यांच्यावर शाई फेक करणारा शिवधर्म फाऊंडेशनचा दीपक काटे याने त्याची बाजू मांडताना संभाजी ब्रिगेड आणि मातृसंस्थेविरोधात वक्तव्य केले आहे.
ती केवळ शाई फेक
प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई हल्ला नव्हता ती फक्त शाई फेक होती. कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही. संभाजी ब्रिगेड या नावात छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा होणार उल्लेख हेच कारण आहे. तुम्ही शाई फेक केली की ती शाई फेक आम्ही केली तर भ्याड हल्ला, असे कसे होईल, असे मत शिवधर्म फाउंडेशनचे दीपक काटे म्हणाले.
संभाजी ब्रिगेड या नावात छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा होणार उल्लेख हेच कारण,याबाबत वारंवार त्यांच्याशी संपर्क करूनही काहीच केलं नाही म्हणून निषेध म्हणून शाई फेक केली आहे,ही शाई फेकची प्रथा संभाजी ब्रिगेडने सुरू केली आहे. सामाजिक दहशतवाद म्हणतात ना बोवो गे बबुल तो आम केसे उगेगे,तुम्ही शाई फेक केली की ती शाई फेक आम्ही केली तर भ्याड हल्ला, कसा होतो. शंभर लोकांत तुम्ही होता तो हल्ला कसं म्हणू शकता? संभाजी महाराज यांच्या रोज होणार एकेरी उल्लेख ही चूक होती. आता ही चूक झाकण्यासाठी जीवघेणा हल्ला झाला, असा आरोप करण्यात येत आहे, असे मत काटे यांनी मांडले.
दीड वर्ष वाट पाहिली
आम्ही दीड वर्ष थांबलो. आम्ही पत्रव्यवहार केला. त्यावेळी सांगायच ना थोडं थांबा, तुम्हाला छत्रपती लावायला अडचण होती तर तुम्ही छत्रपती संभाजी राजे ब्रिगेड लावायचं होत ना. तुम्ही तस न करता जाणूनबुजून संभाजी ब्रिगेड नाव ठेवलं,अक्कलकोट जिल्हाध्यक्षाला संभाजीराजे भोसले म्हणता त्याच कर्तृत्व शून्य आहे,आणि आमच्या राज्याना संभाजी म्हणता, म्हणजे तुम्ही जाणूनबुजून अपमान करत आहात, असा आरोप काटे यांनी लावला.
ते मराठे राहिलेच नाही
संभाजी ब्रिगेडने शिवधर्म स्थापन केला आहे. त्यामुळे ते तिकडे गेले आहेत. ते मराठे राहिलचे कुठं, असा सवाल करत आम्ही पण मराठे आहोत, असे वक्तव्य काटे यांनी केले. तर संभाजी ब्रिगेड, प्रवीण गायकवाड हे पुरोगामी नाहीत प्रतिगामी आहेत असा आरोपही त्यांनी केला.
चूक झाकण्यासाठी राजकीय टच
संभाजी ब्रिगेड यांनी त्याची चूक झाकण्यासाठी राजकीय टच दिला, दीड वर्षांपासून ह्या आंदोलना मागे मी आहे,अशी अनेक आंदोलने केली. त्यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझं काम बघून मला भाजप मध्ये घेतलं. सरकारच्या विरोधात देखील मी आंदोलने केली. मग त्यावेळी बावनकुळे यांनी फूस लावली का? हे आंदोलन शिवधर्म फाउंडेशनच स्वतंत्र आंदोलन होतं. त्यात भाजपचा काही संबंध नाही. माझा प्रदेश सचिव पदाचा कालखंड 2024 ला संपला आहे. आपलं अपयश कुठं लपवायच तर भाजप,बावनकुळेच नाव घेऊन ढकल्याच ही संभाजी ब्रिगेडची चाल आहे, असा आरोप काटेंनी केला.