AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prostitution Racket : पुण्यात कोरेगावसारख्या भागात स्पा सेंटरमधून वेश्या व्यवसाय, तीन विदेशी महिलांची सुटका

Pune Prostitution Racket : पुणे शहरातील वेश्या व्यवसाय प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात एका अभिनेत्री आणि मॉडेलला या व्यवसायात अडकवणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिघांना अटक करण्यात आली आहे.

Prostitution Racket : पुण्यात कोरेगावसारख्या भागात स्पा सेंटरमधून वेश्या व्यवसाय, तीन विदेशी महिलांची सुटका
पुणे मसाज सेंटरImage Credit source: social media
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 14, 2023 | 3:25 PM
Share

अभिजित पोते, पुणे : पुणे शहर आणि परिसरात वेश्या व्यवसाय अनेक ठिकाणी सुरु आहे. विशेषत: स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी पंचतारांकीत हॉटेलमधील सेक्स रॅकेटवर कारवाई केली. त्यानंतर पुणे पोलिसांनी कोरेगाव पार्कसारख्या उच्चभ्रू भागातील स्पा सेंटरवर कारवाई केली. तीन स्पा सेंटरवर कारवाई करत पाच महिलांची सुटका केली. त्यात तीन विदेशी महिला आहे. या प्रकरणात एका दलालावर कारवाई झाली आहे.

एकाच दिवशी तीन ठिकाणी कारवाई

पुण्यातील उच्चभ्रू परिसरात असणाऱ्या स्पा सेंटरवर छापे टाकण्यात आले. कोरेगाव पार्क परिसरातील ३ स्पा सेंटरवर पुणे पोलिसांनी ही छापे टाकत धडक कारवाई केली. कोरेगाव पार्क परिसरात असणाऱ्या हेल्थ ल्याड क्लिनिक, थाई स्पा व हेल्थ स्पॉट क्लिनिक तसेच थाई स्पा या तीन सेंटरवर कारवाई झाली. या ठिकाणी पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू होते.

पाच जणांची सुटका

पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षेच्या विभागाने केलेल्या कारवाईत पाच पीडित मुलींची सुटका करण्यात आली. पिडीत महिलांमध्ये ३ परदेशी महिला तर २ भारतीय महिला आहेत. या प्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाकडून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अजून काही जणांचा शोध सुरु आहे.

महिन्याभरात पाचवी कारवाई

पुणे पोलिसांनी स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाविरोधात जोरदार कारवाई सुरु केली आहे. पुणे पोलिसांकडून या महिन्यातील शहरातील विविध स्पा सेंटर केलेली पाचवी कारवाई आहे. यामुळे स्पा सेंटरच्या नावाखाली अनधिकृत व्यवहार करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दाणाणले आहे.

हे ही वाचा

पुण्यातील सेक्स रॅकेटमध्ये अडकली अभिनेत्री अन् मॉडेल, तीन जणांना अटक

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना