AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील सेक्स रॅकेटमध्ये अडकली अभिनेत्री अन् मॉडेल, तीन जणांना अटक

Pune Prostitution Racket : पुणे शहरातील वेश्या व्यवसाय प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात एका अभिनेत्री आणि मॉडेलला या व्यवसायात अडकवणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिघांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील सेक्स रॅकेटमध्ये अडकली अभिनेत्री अन् मॉडेल, तीन जणांना अटक
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 14, 2023 | 2:14 PM
Share

पुणे : पुणे शहर आणि परीसरात वेश्या व्यवसाय अनेक ठिकाणी सुरु आहे. कधी पोलीस स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसाय उघड करतात तर कधी पंचतारांकीत हॉटेलमधील सेक्स रॅकेटवर कारवाई केली जाते. गेल्या काही महिन्यात वेश्या व्यवसायाचे अनेक प्रकार पोलिसांनी उघड केले आहे. आता पोलिसांनी पिंपरी चिंचवडमध्ये सुरु असलेला वेश्या व्यवसाय उघड केला आहे. या प्रकरणात एक मॉडेल आणि एक अभिनेत्री अडकली आहे. तसेच तीन दलालांना पोलिसांनी अटक केली आहे.

नुकतीच पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या पथकाने पिंपळे सौदागरमधील येज लाईन टच दी ब्यूटी या स्पा सेंटरवर धापा टाकला होता. त्यात ५ महिलांची सुटका केली होती. त्यानंतर कोरेगाव पार्कमध्ये टाकलेल्या छाप्यात दोन एजंटांना अटक झाली होती. आता पुणे पोलिसांनी पिंपरी-चिंचवड येथील एका पंचतारांकित हॉटेलवर छापा टाकून एका सेक्स रॅकेट उघड केला आहे. यामध्ये भोजपुरी चित्रपटातील अभिनेत्रीसह दोन महिलांची सुटका केली. त्यात एक मॉडेलही आहे.

कशी झाली कारवाई

वकाड पोलीस ठाण्याचे अधिकारी देवेन चव्हाण यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पिंपरी-चिंचवाडमधील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवला. त्या बनावट ग्राहकाने आधी दलालांशी संपर्क केला. दलालांनी त्यांना अभिनेत्रीचे फोटोही पाठवले. मग हॉटेलमध्ये एक रुमही बुक केले. पोलिसांचा बनावट ग्राहक घटनास्थळी गेल्यावर त्या ठिकाणी भोजपुरी अभिनेत्री आणि मॉडेलला वेश्या व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याचे दिसून आले.

तिघांना अटक

पोलिसांनी प्रबीर मजुमदार, दिनेश यादव आणि विराज यादव अशी अटक केली आहे. हे आरोपी महिलांना फसवून त्यांना मोठ्या रक्कमेचे आश्वासन देऊन वेश्याव्यवसायात अडकत होते. आता वाकड पोलीस महिलांना या रॅकेटमध्ये फसवणाऱ्या लोकांचा शोध घेत आहे. या सेक्स रॅकेटचे धागेदोर कुठपर्यंत आहेत? ग्लॅमर इंडस्ट्रीतील महिलांचा यामध्ये सहभाग आहे का? याची शोधही पोलीस घेत आहेत.

Follow Us
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल