AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे हादरलं! युट्यूबवर बघून अल्पवयीन मुलीकडून स्वतःचीच प्रसूती, नंतर बाळाला थेट….

प्रसूतीची वेळ येताच युट्यूबवर पाहून स्वतःच स्वतःची प्रसूती करणारी ही मुलगी 17 वर्षांची आहे. या प्रकरणी तिच्या आईला आणि ज्या डॉक्टरांकडे तिची तपासणी झाली, त्यांनाही या प्रकरणात आरोपी धरले जाईल.

पुणे हादरलं! युट्यूबवर बघून अल्पवयीन मुलीकडून स्वतःचीच प्रसूती, नंतर बाळाला थेट....
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 17, 2022 | 3:54 PM
Share

पुणेः एका अल्पवयीन मुलीने (Minor Girl) केलेल्या कृत्यानंतर पुणे तर हादरलच आहे. पण कृत्य पाहून अवघा महाराष्ट्र (Maharashtra) सुन्न होईल. एका अल्पवयीन मुलीने युट्यूबवर  पाहून स्वतःच स्वतःची प्रसूती केली. इथपर्यंतची घटना ऐकणं कुणालाही सहन होईल, पण त्याही पुढे जाऊन याच मुलीने हे बाळ थेट खिडकीबाहेर फेकून दिलं… मुलगी दुसऱ्या मजल्यावर राहात असल्याने तेवढ्या उंचावरून हे बाळ पडलं… राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सदर बाळावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे. पण आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी माध्यमांना ही धक्कादायक माहिती दिली.

चाकणकर यांनी याविषय़ीचं सविस्तर ट्विट केलंय. तसंच व्हिडिओच्या माध्यमातून ही बाब किती भयंकर आणि सर्वांनीच गंभीर दखल घेण्यासारखी आहे, हे स्पष्ट केलंय.

पुण्यातील उत्तम नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोंडवे धावडे येथील ही घटना आहे. विशेष म्हणजे मुलगी एका खोलीत हा सगळा प्रकार करत असताना तिच्या आईला याची कल्पना होती. किंबहुना मागील 9 महिन्यांपासून आईलाही कल्पना होती. तिनं देखील मुलीच्या अशा कृतीला पाठबळ दिलं, हे धक्कादायक आहे.

प्रसूतीची वेळ येताच युट्यूबवर पाहून स्वतःच स्वतःची प्रसूती करणारी ही मुलगी 17 वर्षांची आहे. या प्रकरणी तिच्या आईला आणि ज्या डॉक्टरांकडे तिची तपासणी झाली, त्यांनाही या प्रकरणात आरोपी धरले जाईल. तसेच ज्या मुलामुळे ती मुलगी गरोदर राहिली, त्याचाही शोध सुरु असल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.

या प्रकरणात डॉक्टरांनी महिला आयोगाला किंवा महिला व बालकल्याण विभागाला यासंदर्भात माहिती देणं आवश्यक होतं, अशी भूमिका त्यांनी मांडली. सदर घटना दोन दिवसांपूर्वी घडली. कॉलनीतील कार्यकर्त्यांनी ही माहिती तत्काळ महिला व बालकल्याण विभागाला कळवली. त्यानंतर सध्या बाळावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.