Ajit Pawar | शरद पवार यांच्यासोबत एकत्र येणे अजित पवार यांनी टाळले

Pune News | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीनंतर अजित पवार यांनी वेगळी चूल मांडली. राज्यातील सत्तांत्तरानंतर प्रथमच दोन्ही पवार शुक्रवारी एकत्र येणार होते. परंतु अजित पवार यांनी पुन्हा एकदा एकत्र येणे टाळत आपला पुढच्या प्रवाशाला रवाना झाले.

Ajit Pawar | शरद पवार यांच्यासोबत एकत्र येणे अजित पवार यांनी टाळले
Follow us
| Updated on: Sep 15, 2023 | 2:19 PM

पुणे | 15 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड पुकारला. शरद पवार यांच्याविरोधात भूमिका घेत अजित पवार यांनी आपला प्रवास सुरु केला. अजित पवार भाजप-शिवसेनेसोबत सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर अजित पवार गटातील आमदारांवर कारवाई करण्याची प्रक्रिया शरद पवार गटाकडून सुरु झाली आहे. तसेच शरद पवार स्वत: अजित पवार गटातील आमदारांच्या मतदार संघात जाऊन सभा घेत आहेत. या सर्व राजकीय पार्श्वभूमीर अजित पवार आणि शरद पवार शुक्रवारी पुन्हा एकत्र येणार होते. परंतु अजित पवार यांनी एकत्र येणे टाळले.

कोणत्या ठिकाणी येणार होते एकत्र

शरद पवार आणि अजित पवार मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या (व्हीएसआय) बैठकीनिमित्त एकत्र येणार होते. व्हीएसआयच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी होणार आहे. बैठकीला व्हिएसआयचे अध्यक्ष शरद पवार आणि संस्थेचे संचालक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित राहतील, असा अंदाज होता. राज्यातील सत्तांत्तर झाल्यानंतर प्रथमच सार्वजनिक व्यासपीठावर दोन्ही पवार एकाच व्यासपीठावर येणार होते. परंतु अजित पवार यांनी बैठकीला जाणे टाळले आणि दौंडच्या दिशेने रवाना झाले.

यापूर्वी टाळले होते…

शरद पवार आणि अजित पवार १२ ऑगस्ट रोजी एकत्र येणार होते. साखर कारखाना महासंघाच्या वतीने साखर कारखानदारांसाठी कार्यशाळा त्यावेळी आयोजित केली होती. परंतु त्याच दिवशी पुण्यातील चांदणी चौक पुलाचे उद्घाटन होते. त्यामुळे अजित पवार आले नाही. परंतु शरद पवार आणि अजित पवार गटातील मंत्री दिलीप वळसे पाटील एका व्यासपीठावर आले होते. त्यानंतर दोघांना एकत्र येण्याची आता संधी होती. परंतु अजित पवार यांनी एकत्र येणे टाळले.

हे सुद्धा वाचा

सत्ताबदलानंतर एकत्र आले नाहीच

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर शरद पवार आणि अजित पवार सार्वजिनक व्यासपीठावर एकत्र आले नाही. द्राक्ष बागाईतदार संघाच्या वार्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन २७ ऑगस्ट रोजी शरद पवार यांच्या हस्ते वाकड येथे झाले होते. त्यावेळी अजित पवार दुसर्‍या दिवशी गेले. त्यामुळे त्या ठिकाणी एका परिवारातील हे दोन्ही राजकीय नेते एकत्र आले नाही.

Non Stop LIVE Update
उडता पंजाब झाला आता उडता महाराष्ट्र होणार का? सुप्रिया सुळे यांची टीका
उडता पंजाब झाला आता उडता महाराष्ट्र होणार का? सुप्रिया सुळे यांची टीका.
मला तिकीट दिलं तर मी जिंकणार..उमेदवार कुणी का असंना - रवींद्र धंगेकर
मला तिकीट दिलं तर मी जिंकणार..उमेदवार कुणी का असंना - रवींद्र धंगेकर.
आव्हाडांनी तुतारी वाजवली पण... अमोल मिटकरी यांनी काय दिले ओपन चॅलेंज?
आव्हाडांनी तुतारी वाजवली पण... अमोल मिटकरी यांनी काय दिले ओपन चॅलेंज?.
ज्या समाजाने देव केलं..तोच उद्या दगडं मारील, बारसकर बरसले
ज्या समाजाने देव केलं..तोच उद्या दगडं मारील, बारसकर बरसले.
'ही अजितदादांची करामत, 40 वर्षांनंतर शरद पवारांना...,' देवेंद्र फडणवीस
'ही अजितदादांची करामत, 40 वर्षांनंतर शरद पवारांना...,' देवेंद्र फडणवीस.
'एकाने तुतारी वाजवायची, एकाने मशाल घेऊन....,' काय म्हणाले संजय शिरसाट
'एकाने तुतारी वाजवायची, एकाने मशाल घेऊन....,' काय म्हणाले संजय शिरसाट.
शरद पवार यांना 'तुतारी', छगन भुजबळ म्हणाले जुनं चिन्हच....
शरद पवार यांना 'तुतारी', छगन भुजबळ म्हणाले जुनं चिन्हच.....
...नाही तर घरी बसा, राहुल नार्वेकर कोणावर संतापले
...नाही तर घरी बसा, राहुल नार्वेकर कोणावर संतापले.
आज त्यांना रायगड आठवला ? राज ठाकरे यांची शरद पवारांवर टीका
आज त्यांना रायगड आठवला ? राज ठाकरे यांची शरद पवारांवर टीका.
'तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, महाराष्ट्रात...- चंद्रकांत पाटील
'तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, महाराष्ट्रात...- चंद्रकांत पाटील.