Ajay Banga : अजय बंगा बनले जागतिक बँकेचे अध्यक्ष, काय आहे पुणे शहराशी नाते?

pune based business leader ajay banga : जागतिक बँकेची चावी पुणे शहरात जन्म झालेल्या अजय बंगा यांच्या हातात गेली आहे. पुढील पाच वर्षे ते जागतिक बँकेची धुरा सांभाळणार आहे. बंगा यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Ajay Banga : अजय बंगा बनले जागतिक बँकेचे अध्यक्ष, काय आहे पुणे शहराशी नाते?
अजय बंगा
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 12:24 PM

पुणे : भारतीय वंशाचे व पुणे शहरात जन्म झालेले अमेरिकन उद्योजक, अर्थतज्ज्ञ असलेले अजय बंगा जागतिक बँकेचे अध्यक्ष झाले आहे. अजय बंगा यांचे महाराष्ट्राशी आणि पुण्याशी नाते आहे. त्याबद्दल आता पुणेकरांना अभिमान वाटणार आहे. भारत सरकारने २०१६ मध्ये अजय बंगा यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले होते. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जागतिक बँकेच्या प्रमुख पदासाठी अजय बंगा (Ajay Banga) यांच्या नावाची शिफारस केली होती.

जागतिक बँकेचे १४ वे अध्यक्ष

अजय बंगा जागतिक बँकेचे १४ अध्यक्ष असतील. २ जून २०२३ रोजी ते आपला पदभार स्वीकारणार आहे. पुढील पाच वर्षे ते या पदावर कायम राहणार आहेत. विद्यामान अध्यक्ष डेव्हिड मालपास यांची ते जागा घेणार आहेत. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी बंगा यांना जर्मनी, जपान फ्रांस, इटली, बांगलादेश, कोलंबिया, घाना, केनिया, सऊदी अरब, कोरिया गणराज्य आणि संयुक्त राष्ट्रचा पाठिंबा मिळाला.

हे सुद्धा वाचा

ajay banga

हे असणार आव्हान

जागतिक बँकेचे मुख्य कार्य म्हणजे विकास प्रकल्प आणि लोककल्याणकारी कामे वाढवणे आहे. जगाने नुकतेच कोरोना महामारीशी लढा दिला. यामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. अनेक देश कर्जाच्या सापळ्यात अडकले. या परिस्थितीत जागतिक बँकेचे प्रमुख म्हणून अजय बंगा यांच्यासमोर कमी उत्पन्न असलेल्या देशांच्या आर्थिक गरजा संतुलित करण्याचे मोठे आव्हान असेल.

बंगा यांचा जन्म पुण्यात

६३ वर्षीय बंगा यांचा जन्म महाराष्ट्रातील पुण्यात झाला. त्यांचे वडील हभजनसिंग बंगा भारतीय लष्करात होते. ते लेफ्टनंट जनरल पदावरुन निवृत्त झाले. पुण्यातील खडकी कॅन्टोन्मेंट येथे तैनात होते, त्यावेळी अजय यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ कुटंब पंजाबमधील जालंधरचे आहे. शालेय शिक्षणानंतर अजय बंगा यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी IIM अहमदाबादमधून एमबीए केले.

३० वर्षांचा अनुभव

जागतिक बँकेनं हवामान बदलाबाबत (Climate Change) ठोस पावलं उचलावी, यासाठीचा पाठपुरावा अमेरिका सातत्यानं करत आहे. त्याचवेळी अजय बंगा यांचं नाव अमेरिकेनं सूचवले आहे. त्यांनी दशकभराहून अधिक काळ मास्टरकार्ड या क्रेडीट कार्ड कंपनीचं नेतृत्त्व केलं. ते सध्या एका खासगी इक्विटीमध्ये काम करत आहेत. यापुर्वी सिटीग्रुपच्या अशिया-पॅसिपिक रिजनचे सीईओ होते.

नेस्लेमधून केली सुरुवात

1996 मध्ये सिटीग्रुपमध्ये जाण्यापुर्वी बंगा 1981 मध्ये नेस्ले कंपनीतून आपल्या करियरची सुरुवात केली. भारतात त्यांनी 13 वर्षे काम केले. पेप्सिकोमध्ये दोन वर्ष त्यांनी काम केले. त्याचबरोबर अमेरिकन रेड क्रॉस, क्राफ्ट फूड्स व Dow Inc.मध्येही त्यांनी काम केले. त्यांना सामाजिक विकास विषयात रुची आहे.

बाराक ओबामासोबत केले काम

2015 मध्ये तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याबरोबर त्यांनी काम केले. व्यापार धोरणासंदर्भात ते त्यांचे सल्लागार होते. जागतिक बँक जगभरातील 189 देशांचे नेतृत्व करते. बँकेच्या उद्देश जगभरातील गरिबीचे निर्मूलन करणे हा आहे.

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.