Big Breaking : पुण्यातली स्फोटांची मालिका संपेना, चाकण औद्योगिक वसाहतीतही मोठा ब्लास्ट

कात्रज पाठोपाठ आता पुण्यातील आणखी एका ठिकाणी ब्लास्ट झाल्याची घटना समोर आली आहे. चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनीत काम सुरु असताना ब्लास्ट झाला आहे. विद्युत लाईनमध्ये बिघाड झाल्याने विद्युत बॉक्सचा अचानक स्फोट झाला.

Big Breaking : पुण्यातली स्फोटांची मालिका संपेना, चाकण औद्योगिक वसाहतीतही मोठा ब्लास्ट
पुण्यातल्या चाकणमध्ये पुन्हा एक ब्लास्ट
Image Credit source: tv9
| Updated on: Mar 29, 2022 | 8:33 PM

पुणे : कात्रज पाठोपाठ आता पुण्यातील आणखी एका ठिकाणी ब्लास्ट (Pune Chakan blast) झाल्याची घटना समोर आली आहे. चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये (Blast In Industry) कंपनीत काम सुरु असताना ब्लास्ट झाला आहे. विद्युत लाईनमध्ये बिघाड झाल्याने विद्युत बॉक्सचा (Electric blast) अचानक स्फोट झाला. चाकणमधील आळंदीफाटा येथील शोकिंन कैलास वर्क वर्कशॉप कंपनीत ही घटना घडली. या घटनेमध्ये तीन कामगार गंभीर जखमी झाले असून जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुण्यातली स्फोटांची मालिका काही केल्या संपायचे नाव घेत नाही. दुपारी कात्रज परिसरात एकापाठोपाठ एक ब्लास्ट झाल्याचे पाहायला मिळाले. तर आता चाकण औद्योगीक वसाहतीमध्ये कंपनीत काम सुरु असताना ब्लास्ट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा खळबळ माजली आहे.

स्फोटांची मालिका सुरूच

या दोन्ही स्फोटात मोठं नुकसान तर झालेच आहे. मात्र या चाकणमध्ये झालेल्या स्फोटात काही कामगारही जखमी झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यातले हे दिवसेंदिवस वाढत्या स्फोटांच्या घटना पुणेकरांची चिंंता वाढवत आहे. सुरक्षेची पुरेशी काळजी न घेतल्याने अशा घटना घडत आहेत. त्या टाळणे गरजेचे आहे. त्यासाठी ठोस पाऊलं उचलली जावीत, योग्य ती काळजी घेतली जावी, अन्यथा ही स्फोटांची मालिका थांबणार नाही. दुपारच्या स्फोटाचा व्हिडिओ तर पाहिल्यावर हा युक्रेनच्या युद्धातला व्हिडिओ आहे. काय असे वाटत होते. त्यात आता पुन्हा एक स्पोट झाल्याने पुणेकर हादरून गेले आहे.

दुपारचा स्फोट कुठे झाला?

पुण्यातील कात्रजमध्ये एकापाठोपाठ एक स्फोट झाले. सिलिंडरच्या स्फोटांनी कात्रज परिसर हादरुन गेला आहे. धडकी भरवणारे स्फोटाचे आवाज या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे ऐकू येत आहेत. या स्फोटाच्या आवाजांनी संपूर्ण परिसर हादरुन गेला होता. नेमका हा स्फोट कोणत्या कारणामुळे झाला, याची कोणतीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. लगेचच एकामागून एक स्फोटाचे आवाज ऐकू आले. यात आगीचे प्रचंड मोठे लोळ व्हिडीओमध्ये दिसून आले आहेत. या घटनेने आजूबाजूचा संपूर्ण परिसर हादरुन गेला होता. या आगीचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही. दरम्यान, या आगीमध्ये जीवितहानी झाली आहे का, याचीही माहिती अद्याप मिळू शकलेली.

Big Breaking : पुण्यातली स्फोटांची मालिका संपेना, चाकण औद्योगिक वसाहतीतही मोठा ब्लास्ट

Sangli Crime : सांगलीत चित्तथरारक पाठलाग करत पोलिसांनी पकडला चोरीला गेलेला ट्रॅक्टर

Video: हा स्फोट युक्रेनमधील नाही, तर कात्रजमधला! एकपाठोपाठ एक सिलिंडर स्फोट