पुणे शहरात चाललंय तरी काय? गुन्हेगाराकडून पोलिसांना मारहाण

Pune Crime News : पुणे शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरु असतो. यासंदर्भातील चर्चा विधानभवनापर्यंत होते. पोलीस आयुक्त कठोर कारवाई करत आहे. परंतु त्यानंतरही...

पुणे शहरात चाललंय तरी काय? गुन्हेगाराकडून पोलिसांना मारहाण
हुंड्यासाठी गर्भवती विवाहितेला जिवंत जाळले
Follow us
| Updated on: Jul 24, 2023 | 4:26 PM

अभिजित पोते, पुणे | 23 जुलै 2023 : पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात आहेत. मागील पंधरा दिवसांत दोन ते तीन वेळा कोम्बिंग ऑपरेशन पोलिसांनी राबवले. त्यानंतर अनेक गुन्हेगारांवर कारवाई झाली. काही जणांवर मकोका लावण्यात आला. कोयता गँगच्या मुसक्या आवरण्यासाठी कठोर कारवाई झाली. पोलिसांचे निलंबन आयुक्त रितेश कुमार यांनी केले. त्यानंतर गुन्हेगारी अटोक्यात येत नाही. आता तर चक्क पोलिसांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे.

काय आहे प्रकरण

पुणे शहरात पुन्हा तोडफोड करत पोलिसांना मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावर ही घटना घडली आहे. सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी येथे सराईत गुन्हेगार वैभव ईक्कर आणि त्याच्या साथीदाराने इंद्रप्रस्थ हॉटेलची तोडफोड केली.कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालत बाटल्या फोडल्या. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यानंतर हॉटेलमधील पैसे लुटून नेले.

पोलिसांना केली मारहाण

वैभव ईक्कर आणि त्याच्या साथीदार इतक्यावरच थांबले नाही. त्यांनी हवेली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम यांनाही मारहाण केलीय. त्यामुळे पोलिसांना मारहाण होत असेल तर सामान्य नागरिकांचं काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी झाली होती पोलिसांना मारहाण

पुण्यातील कात्रज पोलीस चौकीत यापूर्वी पोलिसांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता. प्रीतम परदेशी अन् सुजाता परदेशी यांनी पोलीस ठाण्यात मोठमोठ्याने आरडाओरडा करत त्याठिकाणी असलेल्या ठाणे अंमलदार पोलिस हवालदार जाधव यांनी मारहाण केली होती. प्रीतम परदेशी याने पीएसआय  नितीन तानाजी जाधव (वय ३२) यांना ‘आम्ही कोण आहे ते तुला दाखवितो, तुझी वर्दी उतरवितो, अशी धमकी दिली होती.

"मला भिती वाटते माझं वक्तव्य मोठं...ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं आता"
'...तर पक्षातून हकालपट्टी', अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा
'...तर पक्षातून हकालपट्टी', अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा.
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?.
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली.
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान.
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?.
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या.
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?.
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक.
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे.