पुणे शहरात खरंच होणार २४ तास पाणीपुरवठा, हजारो कोटींचा प्रकल्प आहे कुठे?

| Updated on: Mar 18, 2023 | 2:29 PM

पुणे शहरातील रखडलेल्या २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना कधी सुरु होणार? हा प्रश्न प्रत्येक पुणेकरांना पडला आहे. परंतु आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासाठी पुढाकर घेतला आहे. त्यांनी यासंदर्भात महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेतली आहे.

पुणे शहरात खरंच होणार २४ तास पाणीपुरवठा, हजारो कोटींचा प्रकल्प आहे कुठे?
Follow us on

रणजित जाधव, पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) पुणेकरांना २४ तास पाणीपुरवठा करण्याची घोषणा केली होती. पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) या घोषणेच्या अंमलबाजवणीची वाट अनेक वर्षांपासून पाहिली जात आहे. परंतु पुणे येथील नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा अजूनही स्वप्न वाटत आहे. आता पुणे शहरातील रखडलेल्या २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील आढावा घेणार आहे. त्यांनी यासंदर्भात महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेतली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

पुणेकरांना 24 तास पाणीपुरवठा व्हावा यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करून प्रकल्प हाती घेण्यात आला होता. पण अजूनही ही सेवा सुरू झाली नाही. यासाठी शनिवारी पालकमंत्र्यांनी बैठकी घेतली. त्यात योजनेचा आढावा घेतला. नेमकी काय अडचण आहे, ती दूर करण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे, यावर चर्चा करण्यात आली. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पुणे शहरासाठी २४ तास पाणीपुरवठाची रखडलेली योजना पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कारण त्यासाठी आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच पुढाकार घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

बाणेर-बालेवाडीचा प्रश्न


बाणेर बालेवाडी परिसरात पाणी प्रश्न आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी इथे आलोय.एप्रिल मे मध्ये मी स्वतः रोज 25 टँकर उपलब्ध करून देणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 24 बाय 7 पाणी पुरवठा योजना पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. तिची अंलबजावणी बाणेर बालेवडीतून सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.

पीएमसी प्रशासनाने (PMC Administration) 24 तास हेल्पलाईन सुरु केली आहे. यावरुन कधीही तुम्हाला तक्रार (Complaints) करता येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील विविध भागांत पाणीपुरवठा केला जातो. त्यावेळी अनेक ठिकाणी काही तांत्रिक समस्या निर्माण होतात. त्यात नियमित पाणी न येणे, कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, जलवाहिनीतून पाणी वाहून जाणे, जलवाहिनी डॅमेज होणे यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेत. त्यामुळे अनेक वेळा परिसरातील नागरिक रस्त्यांवर येऊन आंदोलनही करतात .

पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले की, मनपाने 24 तास हेल्पलाईन सेवा सुरु केली आहे. त्यात नागरिक आपल्या तक्रारी करु शकतात .020-25501383 या क्रमांकावर लोकांना तक्रारी करता येईल. दाखल झालेल्या तक्रारीची त्वरित दखल घेऊन कारवाई केली जाईल. यामुळे या नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले आहे.

मिळकत कर माफ होणार का


पाचशे स्क्वेअर फुट पर्यंतच्या घरांचा मिळकत कर माफ करणे हे बोलणं सोपं आहे परंतु ते आर्थिक दृष्टया कितपत शक्य आहे ते तपासावे लागणार आहे. त्यामुळे त्याबाबत लगेच निर्णय घेता येणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

निवडणुकीची तयारी
लोकसभेच्या 48 आणि विधानसभेच्या 288 जागा ताकदीने लढवण्याची भाजपची तयारी आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यांत कुणी किती जागा लढवयच्या याबाबत काही ठरलेले नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतला गेला.