VIDEO | पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पत्रकार परिषद, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांचा हसत-हसत काढता पाय

| Updated on: Mar 02, 2021 | 3:39 PM

पुणे पोलिसांवर कुठला दबाव आहे का? पोलिसांची अळीमिळी गुपचिळी का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत. (Pune CP Amitabh Gupta left smilingly)

VIDEO | पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पत्रकार परिषद, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांचा हसत-हसत काढता पाय
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता
Follow us on

पुणे : बीडची तरुणी पूजा चव्हाणचा (Pooja Chavan Death Case) सात फेब्रुवारीला पुण्यात मृत्यू झाला, मात्र याबाबत पुणे पोलिसांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. पूजा चव्हाण प्रकरणात पत्रकार परिषद सुरु असताना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांनी मात्र हसून थेट पत्रकार परिषदेतूनच काढता पाय घेतला. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाल आहेत. (Pune CP Amitabh Gupta left Press Conference smilingly on Pooja Chavan Death Case question)

पूजा चव्हाणच्या शवविच्छेदन अहवालात काय आलं आहे? पूजाच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा कधी दाखल होणार आहे? तपास कुठवर आला? असे विविध प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले होते. मात्र यावर पोलीस आयुक्तांनी फक्त हसून चालू पत्रकार परिषदेतून पळ काढला. पुणे पोलिसांवर कुठला दबाव आहे का? पोलिसांची अळीमिळी गुपचिळी का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

पाहा व्हिडीओ :

आत्महत्येचे प्रकरण, गुन्हा मानूनच तपास सुरु

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण हे आत्महत्येचे आहे. अशा प्रकरणांमध्ये पोलीस नेहमी गुन्हा मानूनच तपास करतात, असे वक्तव्य राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी केले. तसेच या प्रकरणात पुणे पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पोलिसांवर राजकीय दबाव आहे का?

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव आहे का, असा प्रश्न पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मी असे कोणतेही भाष्य करणार नाही, ज्याच्यावरुन तुम्ही नवे अंदाज बांधाल, असे नगराळे यांनी म्हटले. (Pune CP Amitabh Gupta left Press Conference smilingly on Pooja Chavan Death Case question)

वानवडीत जाऊन चित्रा वाघ म्हणाल्या, पुणे पोलीस दलाल, PI लगड यांच्याशी बाचाबाची

भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झालेल्या वानवडी परिसरातील इमारतीला भेट देत पाहणी केली. यावेळी वाघ म्हणाल्या की, पूजा चव्हाण राहात होती तो फ्लॅट सील आहे. वरचे चार फ्लॅट आहेत ते बंद आहेत. आम्ही त्या फ्लॅटच्या वरच्या फ्लॅटची पाहणी केली आहे. गॅलरीतील ग्रीलची पाहणी केली आहे. ग्रीलची ऊंची पाहता पूजा चव्हाण स्वत: खाली पडली? का तिला खाली ढकलले गेले? हे प्रश्न कायम आहेत. दरम्यान, यावेळी चित्रा वाघ आणि वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर वाघ यांनी दीपक लगड यांच्याकडून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास काढून घेण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याकडे द्यावा अशी मागणीदेखील वाघ यांनी केली आहे. दरम्यान, यावेळी वाघ यांनी पुणे पोलीस दलाल असल्याचे वक्तव्य केले आहे.

संबंधित बातम्या  

पूजाच्या चुलत आजीचा खळबळजनक आरोप, 50000000 घेतल्यामुळे पूजाच्या आई-वडिलांचं तोंड गप्प

चुलत आजी म्हणाली, पूजाच्या वडिलांनी 5 कोटी घेतले, आता लहू चव्हाण म्हणतात..

(Pune CP Amitabh Gupta left Press Conference smilingly on Pooja Chavan Death Case question)