Pooja Chavan death case : चुलत आजी म्हणाली, पूजाच्या वडिलांनी 5 कोटी घेतले, आता लहू चव्हाण म्हणतात..

पूजा चव्हाणची चुलत आजी शांताबाई राठोड (Shanta Rathod) यांनी पूजाच्या आई-वडिलांवर गंभीर आरोप केले होते.

  • महेंद्र मुधोळकर, टीव्ही 9 मराठी, बीड
  • Published On - 16:59 PM, 1 Mar 2021
Pooja Chavan death case : चुलत आजी म्हणाली, पूजाच्या वडिलांनी 5 कोटी घेतले, आता लहू चव्हाण म्हणतात..
lahu chavan_Shanta Rathod

बीड : पूजा चव्हाण मृत्यू (Pooja Chavan death case) प्रकरणात, पूजा चव्हाणची चुलत आजी शांताबाई राठोड (Shanta Rathod) यांनी पूजाच्या आई-वडिलांवर गंभीर आरोप केले होते. मात्र पूजाचे वडील लहूदास चव्हाण (Lahu Chavan) यांनी 5 कोटी रुपये घेतल्याचे आरोप फेटाळले आहेत. पूजाच्या आई-वडिलांनी शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याकडून पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. याबाबत लहू चव्हाण म्हणाले, “कोण काय बोलतंय ते माहीत नाही. आम्ही आमच्या दुःखात आहे. इतकंच नाही तर शांताबाई या आमच्या नातेवाईक नाहीत” (Pooja Chavan father Lahu Chavan said not take single rupee from Maharashtra minister Sanjay Rathod Shanta Chavan )

यानंतर अधिक बोलण्यास पूजाच्या वडिलांनी टाळलं. मुख्यमंत्र्यांनी सांगूनही बदनामी थांबली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शांताबाई राठोड लांबच्या नातेवाईक मात्र कसलेच नातेसंबंध नाहीत, असा दावाही लहू चव्हाण यांनी केला.

तृप्ती देसाई, शांताबाई राठोड, चित्रा वाघ यांना भावनिक आवाहन

यावेळी लहू चव्हाण यांनी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, भाजप नेत्या चित्रा वाघ आणि पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांना भावनिक आवाहन केलं. “मी आता थकलोय कृपया आता तरी बदनामी थांबवा” अशी आर्त हाक लहू चव्हाण यांनी दिली.

पूजा ही तुमच्या लेकीसारखी, न्याय द्या बदनामी करु नका. मी पोहरादेवीला जाणार होतो. राजीनाम्यानंतर संजय राठोड यांना भेटलो नाही. राठोड यांचा राजीनामा घेऊ नका अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली होती. पूजाच्या प्रकरणांमध्ये जे दोषी असतील त्याची गय केली जाणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मला दिले आहे, असं लहू चव्हणा म्हणाले.

शांता राठोड यांनी नेमका आरोप काय केला होता? 

“शिवसेना आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी पूजा चव्हाण हिच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचं तोंड गप्प केलं आहे. त्यामुळे पूजाचे आई-वडील कधीच तोंड उघडणार नाहीत”, असा सनसनाटी आरोप पूजाची चुलत आजी शांता राठोड (Shanta Rathod) यांनी केला. पूजाचे आई-वडील कधीच तोंड उघडणार नाहीत. संजय राठोड यांच्याकडून मिळालेले पैसे त्यांनी घरातील जमिनीत पुरुन ठेवले आहेत. यांच्या घरात जावयांमध्ये वाद सुरु आहेत. सध्या पूजाचे आई-वडील नव्हे तर त्यांना दिलेला पैसा बोलत आहे. या सगळ्याच्या माध्यमातून पूजाचे मृत्यूप्रकरण दडपण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजाला न्याय मिळवून द्यावा, ही माझी नम्र विनंती असल्याचे शांता राठोड यांनी सांगितले.

VIDEO : 

(Pooja Chavan father Lahu Chavan said not take single rupee from Maharashtra minister Sanjay Rathod Shanta Chavan)

संबंधित बातम्या  

पूजाच्या चुलत आजीचा खळबळजनक आरोप, 50000000 घेतल्यामुळे पूजाच्या आई-वडिलांचं तोंड गप्प