पूजाच्या चुलत आजीचा खळबळजनक आरोप, 50000000 घेतल्यामुळे पूजाच्या आई-वडिलांचं तोंड गप्प

पूजाच्या आई-वडिलांना स्वत:च्या लेकराची किंमत नाही. याप्रकरणाता आतापर्यंत बंजारा समाजाची दिशाभूल झाली आहे. आता पूजाचे आई-वडील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही दिशाभूल करत आहेत. | Shanta Rathod

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:38 PM, 1 Mar 2021
पूजाच्या चुलत आजीचा खळबळजनक आरोप, 50000000 घेतल्यामुळे पूजाच्या आई-वडिलांचं तोंड गप्प
Pooja Chavan Grandmother

मुंबई: “शिवसेना आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी पूजा चव्हाण हिच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचं तोंड गप्प केलं आहे. त्यामुळे पूजाचे आई-वडील कधीच तोंड उघडणार नाहीत”, असा सनसनाटी आरोप पूजाची चुलत आजी शांता राठोड (Shanta Rathod) यांनी केला.  पूजाच्या आजीचा हा व्हिडीओ भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी शेअर केला आहे. (Pooja Chavan relative Shanta Rathod serious allegations on Pooja’s Mother and Father)

“पूजाला न्याय मिळावा यासाठी मी पहिल्या दिवसापासून आवाज उठवत आहे. पूजाचे आई-वडील काल मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले. पूजाच्या आई-वडिलांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे. पूजाच्या आई-वडिलांना स्वत:च्या लेकराची किंमत नाही. त्यामुळेच त्यांना पूजाच्या हत्याराविषयी बोलायचे नाही आणि पैशामुळे माझे चुलत आजी नातेही त्यांना दिसत नाही.  याप्रकरणात आतापर्यंत बंजारा समाजाची दिशाभूल झाली आहे. आता पूजाचे आई-वडील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray) यांचीही दिशाभूल करत आहेत”, असे शांता राठोड यांनी म्हटले.

‘पूजाच्या आई-वडिलांनी पैसा जमिनीत पुरून ठेवलाय’

पूजाचे आई-वडील कधीच तोंड उघडणार नाहीत. संजय राठोड यांच्याकडून मिळालेले पैसे त्यांनी घरातील जमिनीत पुरुन ठेवले आहेत. यांच्या घरात जावयांमध्ये वाद सुरु आहेत. सध्या पूजाचे आई-वडील नव्हे तर त्यांना दिलेला पैसा बोलत आहे. या सगळ्याच्या माध्यमातून पूजाचे मृत्यूप्रकरण दडपण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजाला न्याय मिळवून द्यावा, ही माझी नम्र विनंती असल्याचे शांता राठोड यांनी सांगितले.

VIDEO : पूजा चव्हाणच्या चुलत आजीचा गंभीर आरोप

पूजाच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया काय? 

दरम्यान, पूजाच्या चुलत आजीने केलेल्या या आरोपानंतर पूजाच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया जाणून घेणाचा प्रयत्न टीव्ही 9 मराठी करत आहे. नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे, पैसे घेतल्याच्या आरोपात कितपत तथ्य आहे, शांता राठोड कोणत्या दाव्याने हा आरोप करत आहेत, याबाबतची उत्तरं मिळणं अपेक्षित आहे.

पूजाचे आई-वडील मुख्यमंत्र्यांना भेटले, म्हणाले…

पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी रविवारी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंना एक पत्र दिलं. हे पत्र परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेदरम्यान वाचून दाखवलं. या पत्रात त्यांनी आमची बदनामी होत असल्याचे म्हटले होते. मुलीच्या अकाली मृत्यूच्या दु:खापेक्षा अधिक त्रासदायक आणि आक्षेपार्ह म्हणजे माझ्या मुलीचा मृत्यू संदर्भात जी चर्चा होत आहे. तिच्यावर खूप गलिच्छ आरोप लावून संजय राठोड यांचे नाव घेऊन उलटसुलट बातम्या येत आहेत. जे निराधार आहेत, असे पूजाच्या आई-वडिलांनी म्हटले होते.

‘पूजाची यवतमाळमध्ये हत्या झाली, पुण्यात फ्लॅटवर नेऊन ढकलले’

यापूर्वी शांताबाई राठोड यांनी संजय राठोड यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला होता. पूजा चव्हाण हिला गर्भपात झाल्यानंतर यवतमाळमध्येच ठार मारण्यात आले. त्यानंतर पुण्याच्या फ्लॅटवर नेऊन तिला तिसऱ्या मजल्यावरुन खाली ढकलण्यात आले, असा दावाही शांताबाई राठोड यांनी केला होता. त्यासाठी पोलिसांनी 7 ते 21 फेब्रुवारीपर्यंतची परळी शहरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी तपासणी करावी, अशी मागणीही शांता राठोड यांनी केली होती.

संबंधित बातम्या:

पूजाच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांना धक्का, वडील म्हणाले…

आमची बदनामी बंद करा, नाही तर मी आत्महत्या करेन; पूजाच्या वडिलांचा आक्रोश

Pooja Chavan Family Letter | पूजा चव्हाणच्या आईवडिलांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भावनिक पत्र

(Pooja Chavan relative Shanta Rathod serious allegations on Pooja’s Mother and Father)