Pooja Chavan Family Letter | पूजा चव्हाणच्या आईवडिलांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भावनिक पत्र

परिवहन मंत्री अनिल परब यांनी पूजाच्या आई-वडिलांनी लिहिलेले पत्र वाचून दाखवले. (Pooja Chavan Family Letter to CM )

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:44 PM, 28 Feb 2021

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्ष भाजपवर सडकून टीकास्त्र डागलं. शिवसेना नेते संजय राठोड यांचा राजीनामा ते पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अशा अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केलं. या पत्रकार परिषदेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी पूजाच्या आई-वडिलांनी लिहिलेले पत्र वाचून दाखवले. (Pooja Chavan Family Letter to CM Uddhav thackeray)

पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी स्वतः पत्र लिहून महाराष्ट्र सरकारवर विश्वास दाखवला आहे. त्यांनी तपास करुन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलीय. तसेच कुटुंबाची बदनामी केलीय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.