पूजा चव्हाणच्या आईवडिलांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भावनिक पत्र, वाचा जसंच्या तसं…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत यासर्व प्रकरणावरील मौन सोडले. (Pooja Chavan Family letter to Uddhav Thackeray)

पूजा चव्हाणच्या आईवडिलांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भावनिक पत्र, वाचा जसंच्या तसं...
pooja chavan family meet uddhav thackeray
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 8:15 PM

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात (Pooja Chavan Death Case) वाढत्या दबावानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत यासर्व प्रकरणावरील मौन सोडले. (Pooja Chavan Mother-Father Wrote emotional letter to Cm Uddhav Thackeray)

या पत्रकार परिषेदपूर्वी पूजाचे आई-वडिल आणि बहिण उद्धव ठाकरेंना भेटले. या  भेटीदरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंना एक पत्र दिलं. हे पत्र परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेदरम्यान वाचून दाखवलं.

पूजाच्या आईवडिलांचं मुख्यमंत्र्यांना दिलेलं भावनिक पत्र

सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, 

आमची मुलगी कु. पूजा चव्हाण हिचा दिनांक 7 फेब्रुवारी रोजी दुर्देवी मृत्यू झाला आहे. कुठल्याही माता-पित्यासाठी आपल्या पोटच्या गोळ्याचा मृत्यू हा अत्यंत वेदनादायी असतो, आमची ही वेदना आता कधीही भरुन येणार नाही. मुलीच्या अकाली मृत्यूच्या दु:खापेक्षा अधिक त्रासदायक आणि आक्षेपार्ह म्हणजे माझ्या मुलीचा मृत्यू संदर्भात जी चर्चा होत आहे. तिच्यावर खूप गलिच्छ आरोप लावून संजय राठोड यांचे नाव घेऊन उलटसुलट बातम्या येत आहेत. जे निराधार आहेत.

आपण यासंबंधी पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत. आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. या घटनेचा तपास वेगाने व्हावा. जे दोषी असतील, त्यांच्यावर आपण निश्चितच कारवाई कराल याची खात्री आहे. (Pooja Chavan Mother-Father Wrote emotional letter to Cm Uddhav Thackeray)

आमच्या मुलीचा बळी गेला, पण फक्त संशयावरुन कोणाचाही बळी जाऊ नये. संजय राठोड यांच्या राजीनाम्याची कोणतीही मागणी आम्ही केली नाही. आमची मुलगी गमावली परंतू या आड राजकारण करुन दररोज होणाऱ्या आरोपाने तिचा रोज बळी जातोय. याचे राजकारण करुन संजय राठोड यांना आरोपी ठरवून राजीनामा घेऊ नये.

तपासामध्ये राठोड किंवा अन्य कोणीही दोषी असल्यास कठोर कारवाई करुन न्याय द्यावा. परंतू संशयावरुन मुलीवर किंवा कोणावरही आरोप करु नये. संजय राठोड हे समाजाचे नेते आहेत. ते खूप कष्ट करुन येथपर्यंत पोहोचले आहे. फक्त संशयावरुन त्याचा बळी घेऊ नये. तपास पूर्ण झाल्यावर दोषींवर कारवाई करावी. राजकारणामुळे आणि दबावाने घाईत निर्णय घेऊ नये. आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आपण आम्हाला न्याय द्यालं.

आपले नम्र,

लहू चंदू चव्हाण (पूजाचे वडील) मंदोधरी लहू चव्हाण (पूजाची आई) दिव्याणी लहू चव्हाण (पूजाची बहीण)

pooja chavan family letter to cm (1)

पूजाच्या आईवडिलांचे उद्धव ठाकरेंना पत्र

(Pooja Chavan Mother-Father Wrote emotional letter to Cm Uddhav Thackeray)

संबंधित बातम्या :

Pooja Chavan Family Letter | पूजा चव्हाणच्या आईवडिलांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भावनिक पत्र

‘तपास योग्य दिशेनंच, दोषीला कठोर शिक्षा देणार’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Sanjay Rathod | संजय राठोड यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलेलं पत्र जसंच्या तसं

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.