संजय राठोडांच्या ‘त्या’ 10 चुका ज्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला

अखेर राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी राजीनामा द्यावा लागलाय.

संजय राठोडांच्या 'त्या' 10 चुका ज्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला
शिवसेना नेते संजय राठोड
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 4:22 PM

मुंबई : अखेर राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी राजीनामा द्यावा लागलाय. मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणाचा पारा वाढवणाऱ्या या विषयाने महाविकासआघाडी सरकारची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत चांगलीच वाढ केली होती. आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष भाजपकडूनही या मुद्द्यावर सरकारची कोंडी होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे आघाडी सरकारने हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. याआधी धनंजय मुंडे यांच्या बाबतही वाद तयार झाला, मात्र त्यांना राजीनामा देण्यापर्यंत प्रकरण वाढलं नाही. दुसरीकडे संजय राठोड यांना राजीनामा देण्याची नामुष्की आली. यामागे राठोड यांनी हे प्रकरण हाताळताना सुरुवातीपासून केलेल्या चुका जबाबदार असल्याचं जाणकार सांगतात. याच 10 चुकांचा हा आढावा (10 Big mistakes of Sanjay Rathod in Pooja Chavan suicide case).

1. 15 दिवस गायब राहीले

संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्येत त्यांचं नाव आल्यानंतर आपली बाजू मांडण्याऐवजी ते संशयास्पद पद्धतीने गायब झाले. माध्यमांनी त्यांना याबाबत प्रतिक्रिया देण्याबाबत प्रयत्न केले, मात्र त्यांची प्रतिक्रिया न मिळाल्याने ते दोषी असल्यानेच या प्रकरणी माध्यमांसमोर येत नाही, असा त्याचा अर्थ निघाला. त्यांनी या प्रकरणी आपली बाजू तब्बल 15 दिवसांनी मांडली. तोपर्यंत त्यांच्याविषयी विरोधी पक्ष भाजपने रान उठवले.

2. समोर आले तर थेट शक्तीप्रदर्शनच केलं

गंभीर आरोप झाल्यानंतर 15 दिवसांनी संजय राठोड माध्यमांसमोर आले. मात्र, त्यांनी यावेळी आपल्या भोवतीचं संशयाचं धुकं कमी करण्याऐवजी शक्तीप्रदर्शन केलं. विशेष म्हणजे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधत गर्दी न करता नियम पाळण्याचं आवाहन केलं होतं. त्याला संजय राठोड यांनी हरताळ फासत मोठी गर्दी जमवली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची नाचक्की झाली. कोरोनाचा विचार करुन मुख्यमंत्र्यांसह शरद पवार आणि इतर अनेकांनी आपले दौरे रद्द केले होते. मात्र, संजय राठोड यांनी या काळातही गर्दी जमवत शक्ती प्रदर्शन केल्यानं आघाडी सरकारबाबत चुकीचा संदेश केला. यावरुन भाजपनेही सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी केली.

3. जातीचा आश्रय घेण्याचा प्रयत्न केला

संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला महिलांविरोधातील गुन्हा असं न पाहता या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. 15 दिवसांनी माध्यमांसमोर बोलताना त्यांनी या प्रकरणातील त्यांच्यावरील आरोप म्हणजे ओबीसींविरोधातील षडयंत्र असल्याचं वक्तव्य केलं. यामुळे राठोड आपला बचाव करण्यासाठी जातीय कार्ड खेळत असल्याचाही आरोप झाला. यातूनही आघाडी सरकारची कोंडी झाली. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणी हल्लाबोल करत आपले गुन्हे लपवण्यासाठी समाजाची ढाल करण्याचा नवा प्रकार राज्यात सुरु झाल्याचं मत व्यक्त केलं.

4. पुजा चव्हाणबद्दल एक ओळ बोलले

राठोड यांनी 15 दिवसांनी पूजा चव्हाण प्रकरणावर भाष्य केलं. मात्र, त्यातही त्यांनी पूजा चव्हाणच्या मृत्यूबद्दल संवदेना व्यक्त करणं किंवा तिच्या कुटुंबीयांना आधार देण्याऐवजी आपण कसे निर्दोष आहे हेच सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राठोड यांना एका मुलीच्या मृत्यूचं दुःख नसून केवळ आपण निर्दोष आहे हेच सांगायचं आहे. याचसाठी ते माध्यमांसमोर आलेत, असा संदेश गेला.

5. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या

पूजा चव्हाणने आत्महत्या करण्याआधी तिचं संजय राठोड यांच्याशी फोनवर अनेकदा बोलणं झाल्याचा गंभीर आरोप भाजपने केला. याच्या अनेक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाल्या. त्यामुळे संजय राठोड यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली. या वादग्रस्त ऑडिओ माध्यमांच्या हाती लागल्याने संजय राठोड यांची मोठी कोंडी झाली. माध्यमांनी यावर राठोड यांना कठोर प्रश्न विचारल्याने ते बॅकफूटवर आले.

6. क्लिप बनावट वगैरे आहेत हे सुद्धा बोलले नाही

विशेष म्हणजे संजय राठोड यांनी व्हायरल झालेले ऑडिओच्या सत्यतेवरही आक्षेप घेतला नाही. त्यांनीच हे ऑडिओ खोटे असल्याचा दावा न केल्याने त्यांचे हे ऑडिओ खरे असल्याचा भाजपचा दावा खरा ठरला. त्यामुळे पूजाच्या आत्महत्येला राठोडच जबाबदार असल्याचं चित्र तयार झालं. या ऑडिओत बोलणारा अन्य एक व्यक्ती अरुण राठोड हाही गायब असल्याने आणि त्याच्यावरही कारवाई न झाल्याने आणखी संशयास्पद वातावरण तयार झालं.

7. मातोश्रीचा विश्वास गमावला

संजय राठोड यांनी सुरुवातीपासून या प्रकरणात संशयास्पद भूमिका घेतली. त्यांच्यामुळे महाविकासआघाडीला घेरण्यासाठी विरोधी पक्षाच्या हाती मोठा मुद्दा सापडला. विशेष म्हणजे या मुद्द्यावरुन भाजपने शिवसेनेवर मोठे हल्ले चढवले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अशातच संजय राठोड यांनी या प्रकरणाची चौकशी होऊन निकाल येऊपर्यंत स्वतःहून पदापासून दूर होण्याऐवजी शक्तीप्रदर्शन करत शिवसेनेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राठोड यांनी मातोश्रीचा विश्वासही गमावला.

8. आघाडीच्या नेत्यांसोबत संवाद नसणं?

संजय राठोड यांनी महाविकासआघाडी सरकारच्या इतर नेत्यांसोबत संवाद न ठेवल्यानं त्यांच्यावर आरोप झाल्यावर त्यांच्या बचावासाठी कुणीही पुढे आलं नाही. भाजपकडून जोरदार हल्ले चढवले जात असताना आणि माध्यमांमधूनही तीव्र प्रतिक्रिया येत असताना संजय राठोड एकाकी पडले. त्यामुळेही राठोड यांची अडचण वाढली.

9. भाजपचा हल्ला परतऊ शकले नाही

संजय राठोड आक्रमक विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देऊ शकले नाही. भाजपचे शाब्दिक हल्ले परतवू न शकल्याने संजय राठोड यांच्याविषयीची जनमानसातील प्रतिमा मलीन झाली. तसेच त्यांच्याभोवती संशयाचं धुकं वाढलं.

10. अरुण राठोडचं गायब असणं

पूजा आत्महत्येनंतर ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या त्यात अरुण राठोड नावाचा व्यक्ती महत्त्वाचा साक्षीदार असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून या घटनेविषयीचं सत्य जनतेसमोर येणं आवश्यक होतं. खरंतर त्याने स्वतः पोलिसांच्या समक्ष येऊन याबाबत खुलासा करणं गरजेचं होतं. असं असताना अरुण राठोड गायब झाला. यामुळे त्याला गायब करण्यात संजय राठोड यांचाच हात असल्याचा गंभीर आरोप झाला. त्यालाही राठोड यांना प्रत्युत्तर देता आलं नाही.

संबंधित बातम्या :

LIVE | पूजा चव्हाण प्रकरणाची दोषपूर्ण चौकशी व्हायला हवी : सुधीर मुनगंटीवार

ठाकरे मंत्रिमंडळातील पहिली विकेट, वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

पूजा चव्हाणच्या आजी आल्या आता गुन्हा दाखल करा; तृप्ती देसाई यांची मागणी

संबंधित व्हिडीओ :

10 Big mistakes of Sanjay Rathod in Pooja Chavan suicide case

Non Stop LIVE Update
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.