AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News : या चोरांनी कमालच केली, आधी गेले ज्योतिषींकडे, चांगला मुहूर्त काढला, मग केली चोरी

Pune crime news : पुणे जिल्ह्यात चोरीचा एक वेगळा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे त्या चोरीची चर्चा होऊ लागली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली आहे.

Pune News : या चोरांनी कमालच केली, आधी गेले ज्योतिषींकडे, चांगला मुहूर्त काढला, मग केली चोरी
ताडदेव परिसरात चोरीदरम्यान वृद्ध महिलेचा मृत्यू
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 22, 2023 | 4:21 PM
Share

पुणे | 22 ऑगस्ट 2023 : देशात चोरीच्या अनेक घटना घडत असतात. काही मोठ्या चोरींच्या घटना उघड झाल्यावर त्याची चर्चा होते. परंतु काही घटना पोलीस दप्तरीच असतात. पुणे जिल्ह्यातील चोरीची एक घटना सध्या चांगलीच चर्चेची ठरली आहे. काय तर या चोरट्यांनी चोरी केली. चोरीही मोठी होती. परंतु चोरी करण्यापूर्वी त्यांनी ज्योतिषीचा सल्ला घेतला होता. मग तो सल्ला कितपत यशस्वी झाला? परंतु हे चोरटे मात्र चोरी केल्यानंतर पोलिसांच्या सापळ्यात आले. पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे नेमका प्रकार

पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये एक कोटी रुपयांची चोरी झाली होती. सागर गोफेन यांच्या घरी ही चोरी झाली होती. ते घरी नसताना त्यांच्या पत्नीस चोरट्यांनी बंधक बनवले होते. त्यानंतर त्यांच्या घरातून 95 लाख रुपये रोकड आणि 11 लाख रुपये किंमतीचे सोने, चांदीचे दागिने घेऊन फरार झाले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास केला. सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर आरोपींची ओळख पटली. तपासानंतर सचिन जगधाने, रायबा चव्हाण, रवींद्र भोसले, दुर्योधन उर्फ दीपक जाधव आणि नितिन मोरे यांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

काय केले आरोपींनी

आरोपींची पोलिसांनी चौकशी सुरु केली. या चौकशीनंतर त्यांच्याकडून धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी सांगितले की, या पाच दरोडेखोरांनी चोरी करण्यापूर्वी शुभ मुहूर्त पाहिला होता. त्यासाठी ते एका ज्योतिषीकडे गेले होते. त्यानंतर त्यांनी चोरी केली होती. यानंतर आता पोलिसांनी ज्योतिषी रामचंद्र चावा यालाही अटक केली आहे. आरोपींकडून 76 लाख रुपये वसूल करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?