AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतीसोबतचे वाद मिटवण्यासाठी देवऋषी बाबाकडे गेली अन् नंतर जे घडलं…; पुण्यातील भोंदू बाबाचा अघोरी खेळ उघड

पुण्यातील स्वारगेट परिसरात एका भोंदू बाबाने वैवाहिक वाद मिटवण्याचे आणि गुंतवणुकीचे आमिष दाखवून ४२ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केले व ५० लाखांची फसवणूक केली.

पतीसोबतचे वाद मिटवण्यासाठी देवऋषी बाबाकडे गेली अन् नंतर जे घडलं...; पुण्यातील भोंदू बाबाचा अघोरी खेळ उघड
pune bhondu baba
| Updated on: Apr 13, 2026 | 7:49 AM
Share

सध्या राज्यात भोंदू बाबांचे अघोरी कृत्य समोर येत आहेत. त्यातच आता पुण्यातील एका भोंदू बाबाचे पितळ उघडं पडलं आहे. वैवाहिक वाद मिटवून देणे, नोकरी लावणे आणि गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका ४२ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. एवढेच नव्हे, तर आरोपीने विविध कारणांसाठी महिलेकडून तब्बल ५० लाख ५५ हजार रुपये उकळून तिची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी औदुंबर मनोहर गडदे (४३) याने स्वतःची ओळख देवऋषी (भोंदू बाबा) अशी करून दिली होती. पीडित महिलेचे तिच्या पतीसोबत काही कौटुंबिक मतभेद होते. हे वाद मिटवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन त्याने महिलेशी जवळीक साधली. त्यानंतर, त्याने महिलेला विश्वासात घेऊन स्वारगेट परिसरातील एका लॉजवर बोलावले. तिथे तिच्यावर अत्याचार केला.

केवळ इतक्यावरच न थांबता, आरोपीने पीडित महिलेला लोणेरे, कुत्तेखोल आणि माणगाव यांसारख्या विविध ठिकाणी बोलावून तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केले. या काळात त्याने महिलेला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच गुंतवणुकीतून मोठी रक्कम मिळवून देण्याचे खोटे स्वप्नही दाखवले. या प्रलोभनातून त्याने महिलेकडून वेळोवेळी ५० लाख ५५ हजार रुपये उकळले. हा प्रकार २७ मे २०२१ ते १७ मार्च २०२६ या कालावधीत घडत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

आरोपीने वारंवार भीती दाखवून आणि फसवणूक करून महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने धाडस एकवटून स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून स्वारगेट पोलिसांनी आरोपी औदुंबर मनोहर गडदे याच्या विरोधात लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. आरोपीने अशाच प्रकारे इतर महिलांचीही फसवणूक केली आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!