Pune rape case : पुणे बलात्कार प्रकरणात मोठं ट्विस्ट, दत्ता गाडेच्या पत्नीचा धक्कादायक दावा

मंगळवारी पहाटेच्या सुमारास पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली, बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला.

Pune rape case : पुणे बलात्कार प्रकरणात मोठं ट्विस्ट, दत्ता गाडेच्या पत्नीचा धक्कादायक दावा
Image Credit source: social
| Updated on: Mar 02, 2025 | 4:10 PM

मंगळवारी पहाटेच्या सुमारास पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली, बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर आरोपी असलेला दत्तात्रय गाडे हा फरार झाला होता. तो पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील गुणा गावचा रहिवासी आहे. अखेर पोलिसांनी त्याच्या गावात त्याच्या मुसक्या आवळल्या, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  आता या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यातच आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पत्नीनं आता मोठा दावा केला आहे.

काय आहे नेमका दावा?

माझा नवरा गुलटेकडी येथे बाजारात शेतातील माल विकण्यासाठी गेला होता आणि स्वारगेट येथे हा प्रकार घडला आहे. जे काही घडलं ते संमतीने झालं आहे. तो घरी येण्यासाठी स्वारगेट येथील बस आगारमध्ये थांबला होता, आमचा कायदा सुव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. जे सत्य आहे ते पोलिसांनी समोर आणावं अशी आमची मागणी आहे, असं आरोपीच्या पत्नीनं म्हटलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? 

पुण्यामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे, पुण्यामध्ये गेल्या मंगळवारी पाहाटेच्या सुमारास एका तरुणीवर बालात्कार करण्यात आला. स्वारगेट स्थानकात उभ्या असलेल्या एका बसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनेनंतर या प्रकरणातील आरोपी फरार झाला होता. गुणाट गावातून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या, आरोपी त्याच्याच गावात लपून बसल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्याच्या शोधासाठी तब्बल 13 पथकं तैनात करण्यात आली होती, गावाला पोलीस छावणीचं स्वरुप प्राप्त झालं होतं. आरोपीवर पोलिसांनी बक्षिस देखील ठेवलं होतं. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं. न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान पीडित मुलीचा जो वैद्यकीय अहवाल समोर आला, त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे, पीडितेवर दोनदा अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू आहे, या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.