महिलांवर हल्ला करणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद; ड्रोनच्या साहाय्याने शोध घेऊन बंदोबस्त

| Updated on: May 14, 2022 | 4:01 PM

पुणेः खेड तालुक्यातील रेटवडी आणि जऊळुके (Retwadi And Jauluke) येथील तीन महिलांवर जीवघेणा हल्ला करणारा तो नरभक्षक बिबट्या (Leopard) अखेर जेरबंद (Martingale) करण्यात वनविभागाला यश आले आहे. बिबट्याचा शोध ड्रोन कॅमेराद्वारे करण्यात आल्यानंतर रेस्क्यू करण्यात आले. त्यानंतर त्याला जेरबंद करण्यात आले. ज्यावेळी बिबट्याने महिलांवर हल्ला केला होता, त्यावेळेपासून परिसरात बिबट्याची दहशत होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी वारंवार […]

महिलांवर हल्ला करणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद; ड्रोनच्या साहाय्याने शोध घेऊन बंदोबस्त
पुणे जिल्ह्यातील नरभक्षक बिबट्या जेरबंद
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणेः खेड तालुक्यातील रेटवडी आणि जऊळुके (Retwadi And Jauluke) येथील तीन महिलांवर जीवघेणा हल्ला करणारा तो नरभक्षक बिबट्या (Leopard) अखेर जेरबंद (Martingaleकरण्यात वनविभागाला यश आले आहे. बिबट्याचा शोध ड्रोन कॅमेराद्वारे करण्यात आल्यानंतर रेस्क्यू करण्यात आले. त्यानंतर त्याला जेरबंद करण्यात आले. ज्यावेळी बिबट्याने महिलांवर हल्ला केला होता, त्यावेळेपासून परिसरात बिबट्याची दहशत होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी वारंवार वन विभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करा अशी मागणी करण्यात येत होती.

या घटनेनंतर वन विभागानेही बिबट्याचा शोध ड्रोनद्वारे करुन त्याला जेरबंद करण्यात आले. त्यामुळे जंगल परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

हल्ला करण्याचा उच्छाद

मागील आठ दिवसांपासुन या बिबट्याने माणसांवर हल्ला करण्याचा उच्छाद मांडला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. बिबट्याला पकडण्याचे वन विभागातर्फे रेस्क्यू 48 तास सुरु होते. यामध्ये ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला.

ड्रोनच्या साहाय्याने जेरबंद

ड्रोनद्वारे बिबट्याचा शोध घेत आज अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यात आले. यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

शेतात जातानाही भीती

गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचा वावर वाढला होता. त्यानंतर थोड्याच दिवसात बिबट्याने तीन महिलांवर हल्ला केल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. याआधीही बिबट्याकडून नागरिकांवर व जनांवर हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे शेतीशिवारात जाणाऱ्या शेतकरीवर्गामध्येही भीतीचे वातावरण होते.