पुणे लॉकडाऊनच्या नियमावलीत बदल, सुरु झालेली कोणती दुकानं पुन्हा बंद राहणार?

राज्य सरकारच्या नियमावलीनुसार आता पुण्यातील स्पा, सलून आणि जिमही बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

पुणे लॉकडाऊनच्या नियमावलीत बदल, सुरु झालेली कोणती दुकानं पुन्हा बंद राहणार?
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि पुणे लॉकडाऊन
| Edited By: | Updated on: Jun 02, 2021 | 3:29 PM

पुणे : राज्य सरकारने 1 जूनपासून राज्यातील लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुण्यातील कडक निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवर पुणे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार स्पा, सलून आणि जिम सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र, राज्य सरकारच्या नियमावलीनुसार आता पुण्यातील स्पा, सलून आणि जिमही बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. मोहोळ यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. (Pune salons, parlors, spas, gyms will be closed)

सलून, स्पा, जिम बंद राहणार !

‘पुणे मनपा हद्दीत आपण निर्बंध शिथिल केले असले तरी राज्य सरकारच्या आदेशानुसार सलून, पार्लर, स्पा, जिम बंद ठेवण्यात येत आहे. सलून आणि पार्लर सुरु ठेवण्याचा निर्णय आपण स्थानिक पातळीवर घेतला होता. मात्र राज्य सरकारच्या निर्देशानुसार बदल करण्यात आला आहे’, असं ट्वीट मोहोळ यांनी केलंय.

दुकानदारांमध्ये काही काळ संभ्रमावस्था

महापौर म्हणतात दुकाने सुरु मात्र आयुक्त म्हणतात दुकाने बंद यामुळे सलून व्यवसायिक काही काळ मोठ्या संभ्रमात होते. वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर आणि प्रिंट मीडियामध्ये काही ठिकाणी सलून बंद आणि काही ठिकाणी सुरु असा उल्लेख आहे. त्यामुळे सर्व सलून व्यवसायिक, ब्युटी पार्लर व्यवसायिक तसेच इतर दुकानदार यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं.

पुण्यात काय सुरु राहणार?

1. सकाळी 7 ते दुपारी 2 यावेळेत पुण्यात सर्व प्रकारची दुकाने सुरु राहणार
2. शासकीय कार्यालये 25 टक्के क्षमतेने सुरु राहणार
3. रेस्टॉरंट व बार हे फक्त पार्सल/घरपोच सेवेसाठी दिनांक 14 एप्रिलच्या आदेशानुसार सुरु राहतील.
4. पुणे महानगर पालिका क्षेत्रातील सर्व बँका कामाचे सर्व दिवस सुरु राहतील
5. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.
6. कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहतील.
7. ई-कॉमर्समार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू (Essential / Non-essential) यांची घरपोच सेवा (Home Delivery) सुरु करणेस मुभा राहील.

पुण्यात काय बंद असणार?

1. पुण्यातील उद्याने, मैदान, मंगल कार्यालय, पीएमपीएमएल बससेवा, सलून, जिम बंद राहणार
2. शनिवार आणि रविवार सकाळी 7 ते 2 यावेळेत फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु राहणार, अन्य दुकाने बंद ठेवली जाणार.
3. दुपारी तीन वाजल्यानंतर नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही

संबंधित बातम्या : 

Pune Lockdown Update : पुण्यातील लॉकडाऊन शिथिल, सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सर्व प्रकारची दुकाने सुरु

पुण्यात शहरी भागातील सर्व दुकाने उघडणार, पण ग्रामीण भागात निर्बंध कायम

Pune salons, parlors, spas, gyms will be closed