पुणे नगर हायवेवर दिवसा ढवळ्या गोळीबार, लोणीकंद परिसरात भीतीचं वातावरण

| Updated on: Feb 09, 2021 | 3:27 PM

पुणे नगर हायवेवर दिवसा ढवळ्या गोळीबार झाला आहे. हायवेवरील लोणीकंद नजीक गावाजवळ हा गोळीबार झालाय.| Pune Lonikand Shooting Accussed absconded

पुणे नगर हायवेवर दिवसा ढवळ्या गोळीबार, लोणीकंद परिसरात भीतीचं वातावरण
Crime-News
Follow us on

पुणे :  पुणे नगर हायवेवर दिवसा ढवळ्या गोळीबार झाला आहे. हायवेवरील लोणीकंद नजीक गावाजवळ हा गोळीबार झालाय. भर दुपारी गोळीबार झाल्याने परिसरातील नागिरांकमध्ये भीतीचं वातावरण होतं. (Pune Lonikand Shooting Accussed absconded)

सविस्तर माहिती अशी की, दुपारच्या सुमारास नगर-पुणे हायवेवर अज्ञात इसमांनी सचिन शिंदे या व्यक्तीवर गोळीबार केला. दोन राऊंड फायर करत गोळीबार करणारे आरोपी फरार झाले. मात्र या गोळीबारात सचिन शिंदे या तरुणाची प्रकृती गंभीर आहे.

सचिन शिंदे गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. गोळी लागल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन आरोपींच्या शोधासाठी पावलं उचलली आहे.

पुणे जिल्ह्यात गोळीबाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. गेल्या एका महिन्यापासून गोळीबाराची ही तिसरी घटना आहे. गेल्या 20 दिवसांपूर्वीच गोळीबाराच्या दोन घटना समोर आल्या होत्या. आता ही भरदुपारी गोळीबाराची घटना घडल्याने लोणीकंद परिसरात गुंडांची दहशत पसरली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कात्रज परिसरात गोळीबार

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच्या मध्यरात्री कात्रज परिसरात गोळीबार झाला होता. यातील सराईत गुंडासह तडीपार गुंडाला दत्तावाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दत्तावाडी पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली होती. अजय घाडगे आणि गणेश पवार अशी आरोपींची नावे आहेत.

फेमस होण्यासाठी केलेला गोळीबार अंगलट

शिरुर आणि शहर परिसरात ग्रुपचे नाव फेमस करण्यासाठी 26 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शिरुर शहरातील भर रस्त्यात निलेश कुर्लप उर्फ एन.के.ग्रुपच्या सात सदस्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या.

(Pune Lonikand Shooting Accussed absconded)

हे ही वाचा :

जुनं भांडण पुन्हा नव्याने उकरलं, दोन गट आपसांत भिडले, तडीपार गुंडांकडून हत्या, नाशिकमध्ये खळबळ

प्रियकराच्या साथीने पतीची हत्या, पोलिसांनी पाच महिन्यांनी प्रेमी युगुलाला पकडलं