जुनं भांडण पुन्हा नव्याने उकरलं, दोन गट आपसांत भिडले, तडीपार गुंडांकडून हत्या, नाशिकमध्ये खळबळ

जुनं भांडण पुन्हा नव्याने उकरलं, दोन गट आपसांत भिडले, तडीपार गुंडांकडून हत्या, नाशिकमध्ये खळबळ
नाशिक मर्डर

शहरात रात्री उशीरा आकाश संतोष रंजवे या तरुणाची तडीपार गुंडांनी हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. (2 Groups hassle Nashik Murder)

Akshay Adhav

|

Feb 09, 2021 | 2:50 PM

नाशिक : शहरात रात्री उशीरा आकाश संतोष रंजवे या तरुणाची तडीपार गुंडांनी हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पूर्ववैमनस्यातून रात्री दहाच्या सुमारास हत्या झाल्याची माहिती मिळत आहे. (2 Groups hassle Nashik Murder)

पूर्ववैमनस्यातून रात्री दहाच्या दरम्यान द्वारका परिसरात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत आकाश संतोष रंजवे या तरुणाला जीव गमवावा लागला आहे. जुन्या भांडण आता नव्याने उकरून काढत आता पुन्हा दोन गट आपसात भिडल्याने झालेल्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झालाय.

दरम्यान शहरात तडीपार गुंडांचा वावर वाढल्याने पोलीस दलात सध्या अस्वस्थता आहे. शहरात तडीपार गुंडांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून शहरात चोरी, मारामारी, चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यातच जुन्या भांडणाची कुरापत काढून द्वारका परिसरात एका तरुणाची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

या हत्या प्रकरणातील 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तर 3 आरोपी फरार आहेत. या घटनासंदर्भात मृताच्या नातेवाईकांनी नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात मोठी गर्दी करून या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान या घटनेनंतर शहरात तडीपार गुन्हेगारांचा वावर वाढल्याचं पुन्हा बघायला मिळत आहे.

सोनसाखळी चोरांचा सिनेस्टाईल पाठलाग, नाशकात सुट्टीवरील पोलिसाची पत्नीसह धडाकेबाज कामगिरी

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ सुरु आहे. नाशिकच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने पत्नीसह प्रवासातून घरी येताना दोन सोनसाखळी चोरांना पकडून त्यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे पोलीस पत्नीने देखील धाडस दाखवून आपल्या पोलीस पतीसह या चोरांचा सिनेस्टाईल पाठलाग करत त्यांना पकडून ठेवलं. क्राईम ब्रांचचे पोलीस कर्मचारी गुलाब सोनार आणि त्यांच्या पत्नी ज्योती सोनार यांच्या या धाडसाचं संपूर्ण शहरात कौतुक होतं आहे.

(2 Groups hassle Nashik Murder)

हे ही वाचा :

फडणवीसांच्या योजनेचं काऊंटडाऊन सुरु, ‘जलयुक्त शिवार’च्या प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात

राणेसाहेबांच्या फोनला प्रतिसाद, उद्धवजी थँक्यू, 7 नगरसेवकांचा स्वीकार करा : नितेश राणे

VIDEO | सुख के सब साथी, दुःख में ना कोई, भाजप आमदार सुरेश धसांच्या गाण्याने काळजाला हात

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें